किनवट : कँसर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील मेघराज हरसिंग साबळे यांना उपचारासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री सहाय्यता निधीमधून 2 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली यामुळे साबळे यांचा पुढील उपचाराचा खर्चाची काळजी मिटली आहे साबळे कुटुंबाने याबाबत खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत .
किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील मेघराज हरसिंग साबळे हे मागील बऱ्याच दिवसापासून कँसर आजाराने त्रस्त होते. आजाराचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथील इंडो अमेरिकन कॅन्सर रुग्णालयात भरती करण्यात आले होते . सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते . घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ऑपरेशनचा खर्च झेपणारा नव्हता. आर्थिक अडचणीमुळे काही काळ शस्त्रक्रिया पुढे लांबविण्यात आली दरम्यानच्या काळात त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या किनवट येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून आर्थिक मदतीसाठी मागणी केली त्यावर तातडीने कारवाई करण्यात आली व सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात येऊन प्रधानमंत्री राहत कोषामधून साबळे यांना २ लक्ष रुपयाची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली . हि आर्थिक मदत नुकतीच रुग्णालयाला प्राप्त झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे . त्यानंतर साबळे यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे . खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने याची दखल घेऊन आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल साबळे कुटुंबाने आभार मानले आहेत .