किनवट:-(प्रतिनिधी )मागील 15 वर्षाच्या काळात किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघ विविध क्षेत्रात कमालीचा माघारला आहे.ही बाब हेरून राज्यात विरोधी पक्षाचे सरकार असतांनाही आ.भीमराव केराम यांनी विविध प्रकारची विकास कामे खेचून आणण्याचा धडाका लावला आहे.अनेक वर्षाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केवळ राज्यावर निर्भर राहून भागणार नाही हे ओळखून त्यांनी थेट दिल्ली दरबार गाठल्याने या मतदारसंघातील मतदार चांगलाच सुखावला आहे.
दिल्ली मुक्कामी आ.केराम यांनी महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची दि.3 ऑगस्ट रोजी भेट घेवून दिलेल्या निवेदनातून केंद्रीय रस्ते विकास निधीतून किनवट / माहूर या आदिवासी भागातील अनेक रस्त्याला मान्यता देवून भरीव निधीची तरतूद करण्याची विनंती केली आहे.तसेच गोकुंदा-मांडवा-घोगरवाडी-तेलंगणा हा सीमा मार्ग नांदेड,आदिलाबाद व चंद्रपुर या जिल्हयाला जोडणारा असल्याने शेतकऱ्यांना मोठी बाजार पेठ उपलब्ध होणार असल्याचा उल्लेख करून निधी अभावी या रस्त्याचे काम रखडल्याचे वास्तव त्यात नमूद केले आहे.याशिवाय सारखणी,मांडवी तलाईगुडा या रस्त्याच्या कामालाही मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी दिलेल्या निवेदनाच्या माध्यमांतून केली आहे.
आ.भीमराव केराम यांनी दिल्ली मुक्कामी आदिवासी विकास मंत्र्यांसह अर्थ राज्यमंत्र्यांची भेट घेतल्याने मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आ.भीमराव केराम धडकले दिल्लीला
353 Views