KINWATTODAYSNEWS

किनवट तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सुरू करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांना भीमराव केराम यांनी दिल्ली येथे भेटून दिले निवेदन

किनवट(आनंद भालेराव)
मा.आमदार भिमराव केराम साहेब यांनी दिल्ली यथे केंद्रीय वित्त राज्यमंत्री मंत्री मा.भागवत कराड साहेब यांची भेट घेऊन बोधडी बु. तीन शाखेची मागणी केली आहे.बोधडी बु, शिवणी व सिंदखेड येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा स्थापण करण्याची मागणी केली आहे.
किनवट तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता हा तालुका अतिदुर्गम व दूरवर पसरला असल्यामुळे किनवट तालुक्यात फक्त चार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा कार्य करीत असून त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शाखा तालुक्यात देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यात माहूर तालुक्यात सिदखेड , वाई बाजार किनवट तालुक्यातील शिवनी ,बोधडी बुद्रुक या ठिकाणी शाखांची स्थापना करण्यात यावी असे ही नमूद करण्यात आले आहे.

तसेच या बँकांना तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार होत असल्यामुळे येथील वाढती गर्दी पाहून खेड्यातील नागरिक या बँकेकडे येण्यास धजत नाहीत. तसेच कार लोन, शेती कर्ज, होम लोन, ऑटो लोन अशी अनेक कामे या बँकेलाच करावी लागत असल्यामुळे येथे प्रचंड गर्दी वाढत आहे. या बँकेचा तान कमी करण्यासाठी तालुक्यातील मोठ्या गावात त ही बँकेची शाखा स्थापन करावी मागणी करण्यात आली आहे.

413 Views
बातमी शेअर करा