किनवट ता.प्र दि ०४ शेतक-यांना पत पुरवठा करणे हे स्थानिक सहकारी वित्तीय संस्थेचे महत्वाचे कर्तव्य आहे, किनवट तालुक्यात सहकाराच्या नावाला फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक आहे परंतु किनवट तालुक्यातील सारखणी येथिल जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेला सहकार क्षेत्रा करिता शेतक-यांना वित्तिय सहायत्ता व पत पुरवठा करण्याचा विसर पडल्याने पिक कर्जा अभावी शेतक-यांना खाजगी शावकारांच्या दावणीला जावे लागत आहे यामुळे या प्रश्ना बाबत जिल्हा बॅकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण यांना थेट निवेदन किनवट माहुर तालुक्यातील प्रश्नाकरिता सतत कार्यशिल असलेले व विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांनी केले आहे.
प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांनी सादर केलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि किनवट तालुक्यातील शेतक-यांना सुरवातीला पावसाने दिलेली हुलकावणी व त्या नंतर झालेली अतिवृष्टी यामुळे अनेकांना दुबार तीबार पेरणी करावी लागली त्यामुळे शेतकरी हा प्रचंड आर्थिक संकटात आला आहे आता शेतक-यांना आगामी हंगाम यशस्वी करण्याकरिता तारेवरची कसरत करुन आपली पिके जगवायची आहे त्याकरिता त्यांना अनेक प्रकारच्या फवारण्या व शेतीपिक पुरक खर्च करायचे आहे त्यास पत पुरवठा अत्यंत आवश्यक आहे. तरी शेतक-यांना पत पुरवठा करण्यास राष्ट्रीयकृत बॅका अयशस्वी ठरल्या आहेत त्यामुळे शेतकरी हा जिल्हा बॅकेकडे आशा पल्लवित करुन आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बॅकांचे कर्तव्य आहे कि त्यांनी सहकाराच्या माध्यमातुन शेतक-यांना पत पुरवठा करावा व सारखणी येथिल जिल्हा मध्यवर्ती बॅक़ शाखेत अत्यल्प कर्मचारी संख्या आहे तर या बॅक शाखेशी ४८ गावे सलग्ण आहेत तर २६ सेवा सोसायट्या ही या शाखेशी सलग्न आहेत एवढा प्रचंड व्याप या बॅक शाखेवर असुन येथे फक्त दोन कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे शेतक-यांना त्यांचा एखादा व्यवहार करायला देखिल तासंतास अडकळुन बसावे लागते. त्यातती अनिष्ठ तफावतीच्या नावाखाली अनेक सेवा सहकारी संस्थाचे सभासद शेतकरी कर्जापासुन वंचित आहेत.
शेतक-यांना होणारा वरिल सर्व हा त्रास पाहता प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांनी थेट निवेदन जिल्हा बॅकेचे अध्यक्ष माजी आ. वसंतराव चव्हाण व बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्याने वरिल अधिका-यांना बॅकेच्या मुख्य शाखेकडुन सारखणी येथिल शाखेचे कारभार सुधारण्यासंबधी सुचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु त्याची अमलबजावनी प्रलंबित असल्याने शेतकरी विविध सुविधे पासुन वंचित आहेत.
तालुक्यातील सारखणी येथिल जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या शाखेला सहकार क्षेत्रा करिता शेतक-यांना वित्तिय सहायत्ता व पत पुरवठा करण्याचा पडला विसर
108 Views