KINWATTODAYSNEWS

नंदीनगर येथील नागरीकांचे रस्त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण

मुदखेड :शहरातील नंदीनगरच्या वस्तीकडे जाणारा जुना रस्त्याचे काम न करता दुसऱ्या नवीन मार्गाने वळवल्याने स्थानिक नागरिकांचे १५ऑगस्ट रोजी मुदखेड नगर परिषदे समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. व त्याच प्रमाणे नंदीनगर ला जाण्यासाठी रस्ता नसल्याने काही दिवसापूर्वी नगरपरिषदेने अंदाजे दहा लक्ष रुपये खर्च करून हा कच्चा रस्ता बनवण्यात आला होता.
तोच रस्ता काँक्रिटीकरण करून देण्यासाठी नंदी नगरीतील स्थानिकांची मागणी असतानाच नगरपरिषदेने मात्र तो रस्तादुसरीकडे वळवल्याने या रस्त्याला नंदीनगर येथील नागरिकांचा विरोध असून काही राजकीय लोकांच्या म्हणण्यानुसार राजकीय लोकांच्या शेती मधून हा रस्ता नेत असल्याने तो रस्ता नंदीनगर च्या लोकांना दूर होत आहे. त्यामुळे जो कच्चा रस्ता अगोदर होता तोच रस्ता नगरपरिषदेने मंजूर करून देण्यात यावा या मागणीसाठी येत्या १५ऑगस्ट रोजी नंदीनगर येथील नागरीकांचे मुदखेड नगरपरिषदे समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन दिनांक २ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेला देण्यात आले आहे.
यावेळी निवेदनकर्ते बापुराव पोशट्टी टमाटेवाले,शिवाजी सायबू पानकोळी, गंगाधर रामा नक्कलवाड,सायलू यल्लपा पानकोळी,प्रकाश रामा जिंकलवाड,मारोती जयराम वाघमारे,गंगाधर रामा टमाटेवाले, बाबुशा गंगाराम वाघमारे,गंगाधर चांदु घंटलवाड,लक्ष्मण पोशट्टी मडकलवाड,इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेख जब्बार मुदखेड प्रतिनिधी

44 Views
बातमी शेअर करा