किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर )
कोठारी ची ग्रामपंचायत अंतर्गत वस्ताद लहुजी साळवे गृहनिर्माण संस्थेच्या वतीने वसाहतीमध्ये शोभिवंत वृक्षाचे लागवड केल्याने परिसरामध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
किनवट पासून पाच किलोमीटर अंतरावर कोठारी ची ग्रामपंचायत कार्यरत असून या ग्रामपंचायती अंतर्गत वस्ताद लहुजी साळवे गृहनिर्माण संस्था च्या वतीने 21 वर्षापूर्वी समाज बांधवांसाठी वसाहत निर्माण करण्यात आली होती वसाहतीमध्ये एकूण 42 लाभधारक असून प्लॉटवर समाज बांधवांनी वास्तु निर्माण करून वास्तव्यास आहे पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावा या उद्देशाने कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन वसाहतीमध्ये व भोवती 83 वृक्षाचे लागवड केले आहे यामुळे भविष्यात पर्यावरणाचा समतोल राहून येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनची मात्रा कमी पडणार नाही या उपक्रमाचे मुख्य सूत्रधार प्रा. प्राचार्य भंडारे सर, प्रा शिंदे सर यांनी पुढाकार घेऊन सोबत सूंकलवाड सर, गायकवाड सर, रामलु कोत्तुरवार,विष्णू जाधव, सुनील कांबळे, आकाश मोरे, वैभव गवळी, राजेश कोत्तुरवार यांनी परिश्रम घेतले असून समाजामध्ये यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
कोठारी (चिखली) येथे वस्ताद लहुजी साळवे गृहनिर्माण संस्था तर्फे वसाहतीत वृक्ष लागवड
128 Views