भोकर (प्रतिनिधी) भोकर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रेमी,अनुयायी व समाज बांधव यांची एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीत सार्वजनिक सोहळ्याच्या अनुशंगाने विधायक, लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या हेतूने चर्चा करण्यात आली.तसेच सदरील जयंती सोहळा साजरा करण्यासाठी कार्यकारिणी गठीत करण्यात आली व सर्वानुमते या सार्वजनिक जयंती मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण संपादक उत्तम बाबळे यांची आणि सचिवपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजेश वाघमारे यांची निवड करण्यात आली.
तर उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे… अशोक निळकंठे(उपाध्यक्ष), संजय बरकमकर(उपाध्यक्ष),जी.जी. गाडे(सहसचिव),दिलीप वाघमारे (कोषाध्यक्ष),सखाराम मोरे(सह कोषाध्यक्ष),पांडुरंग सुर्यवंशी (संघटक),शिवकुमार गाडेकर(सह संघटक),सल्लागार पदी-राजन्ना अण्णा माहूरकर,केरबाजी देवकांबळे, नामदेव वाघमारे,राजू काळे,सायलू काळे,बाबूराव नामेवाड, गोणेकर, सदस्यपदी – सखाराम वाघमारे,अनिल डोईफोडे,बालाजी वाघमारे,श्याम वाघमारे,ॲड.अंबादास काळे,राहूल शेळके,दत्ता मोतेकर,विजय किनीकर, चंद्रकांत बाबळे,गणपत बाबळे,शंकर देवकुळे,गणपत वाघमारे,बालाजी बाबळे,महिला प्रतिनिधी-सुवर्णा वाघमारे,पुजा बनसोडे, लक्ष्मी वाघमारे यांसह आदींची निवड करण्यात आली.
तसेच या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.