KINWATTODAYSNEWS

तेलंगणा मातंग समाजाचे आदर्श नेते आदरणीय स्व. नामदेवराव कांबळे साहेब यांचे हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

किनवट /प्रतिनिधी:
साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे असोशियन अध्यक्ष व आदिलाबाद DCCB बँक चेअरमन मातंग समाजाचे आदर्श नेते आदरणीय स्व. नामदेवराव कांबळे साहेब यांचे हैदराबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.उद्या  दि.29 जुलै रोजी 11 वा.त्यांच्या राहत्या गावी गुंजाळा येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
गुंजाळा मंडळ नारनुर जि. आदीलाबाद येथील नामदेवराव कांबळे साहेब हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे लोकप्रिय नेते होते.कारण त्यांनी निःस्वार्थ भावनेने जनतेची आणि समाजाची सेवा केली. अचानक जाण्याने मातंग समाजाची फार मोठी हानी झाली आहे..मातंग समाजातून एक मौल्यवान हिरा हरवल्याची प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.
नामदेवरावांनी तेलंगाणा, विदर्भ व मराठवाडा राज्यातील मातंग समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे.समाज त्यांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही. अण्णाभाऊ साठे जयंती,पुण्यतिथी, लहुजी साळवे जयंती ,पुण्यतिथी तसेच सर्वच क्षेत्रातील महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करून बहुजन समाजात त्यांच्या विचारांचे बीज पेरले.
साहेबांना सर्वच पक्षाचे नेतेमंडळी मानत असत.बहुजन समाजातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.अनेक कोटूंबिक कलह(वाद)मिटींगीतून निकाली काढल्याने अनेकांचे संसार नव्याने सुरू झाले. अगदी हलाखीच्या परिस्थितीतुन आपल्या संसाराचा गाडा हाकत चांगले नाव कमावले व समाजासाठी अखेरपर्यंत झिजले.
त्यांच्या अचानक जाण्याने मातंग समाज तसेच इतर बहुजन समाजावर कुऱ्हाड कोसळली असून न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना ईश्वर या बहु दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हेच ईश्वरचरणी प्रार्थना.

442 Views
बातमी शेअर करा