KINWATTODAYSNEWS

विजय त्रंबकराव कन्नलवार यांची माहिती अधिकार तपास समिती किनवट तालुकाध्यक्षपदी निवड

किनवट प्रतिनिधी: विजय त्रंबकराव कन्नलवार यांची माहिती अधिकार तपास समिती तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे दत्तात्रय पांडुरंग अनंतवार संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी व व्यापक प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत राहून सोबतच सामाजिक भावनेतून माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत शासकीय-निमशासकीय कार्यालयातून माहिती घेऊन दोषीवर कारवाईस भ्रष्टाचार निर्मूलनसाठी सदैव प्रयत्नशील राहून संघटन मजबूत करण्याच्या हेतूने आपली माहिती अधिकार तपासणी महाराष्ट्राच्या किनवट तालुका अध्यक्षपदी आम्ही आपल्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन प्रेरणा देण्यासाठी नियुक्ती करीत आहोत. यापुढे सामाजिक भावनेतून आपले कार्य सुरू ठेवावे सोबत माहिती अधिकार तपास समिती महाराष्ट्र वाढीसाठी प्रयत्न करावे पुढील कार्यास शुभेच्छा.

146 Views
बातमी शेअर करा