श्रीक्षेत्र माहूर: माहूर तालुक्यात १ ते ३ सप्टेंबर 2024 यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाचे नुकसान पंचनामे केले होते त्या अनुषंगाने शासन स्तरावरून अतिवृष्टी नुकसान रक्कम ३५ कोटी ११ लाख ६८ हजार ४०८ रूपये माहुर तालुक्यासाठी मंजूर झाल्याने सदरील अनुदान रक्कम डि बि टी प्रणाली द्वारे शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकर्यांनी इ के वाय सी करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्यात एकुण शेतकरी संख्या २६ हजार १७२ आहे तर त्या पैकी दि ९ रोजी पर्यंत शेतकरी ई पोर्टलवर १६ हजार ४०९ शेतकऱ्यांनी आपली माहिती अपलोड केली आहे परंतु अजुन ही 10 हजार 144 शेतकऱ्यांनी माहीती अपलोड केलेली नाही माहीती अपलोड करुन घेण्यास तलाठी कोतवाल हे सहकार्य करीत आहेत तेव्हा अशा सर्व व्हि के नंबर प्राप्त झालेल्या शेतकरी यांनी तत्काळ इ के वाय सी करून घ्यावी.त्याशिवाय अनुदान बँक खात्यावर जमा होणार नाही तर ज्या शेतकऱ्यांना व्ही के नंबर प्राप्त झाले नाहीत त्यांनी आपल्या सज्जाच्या तलाठ्याशी संपर्क साधुन व्हि के नंबर प्राप्त करून घ्यावेत जेने करून अतिवृष्टी अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यावर जमा होण्यास विलंब होणार नाही असे अवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
अतिवृष्टी अनुदानसाठी इ के वाय सी करुन घ्या तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन
24 Views