किनवट/प्रतिनिधी: किनवट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सागवान वृक्ष तोडताना तस्करांना रंगेहात पकडण्यात यश आले.
दिनांक 11/1/2025 रोजी मांडवा (कि) जंगलात नेहमीप्रमाणे पायी गस्त करत असतांना सागी झाड तोडत असल्याचा आवाज येणाऱ्या दिशेने पाहणी केली असता जायमोक्यावर शेख अलाउद्दीन शेख उस्मान राहणार गंगानगर किनवट (सागवान तस्कर) एका सागी झाडाला पूर्णपणे तोडून त्याचे कटसाईज नग तयार करतांना रंगेहाथ पकडण्यात आला परंतु 2 सागवान तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांची नावे अनुक्रमे 1) शेख करीम शेख महेबुब राहणार हमालकॉलनी किनवट 2) शेख सोहेल शेख अख्तर राहणार सुभाषनगर किनवट येथील आहे जप्त केलेल्या सागी मुद्देमालाची माहिती खालील प्रमाणे आहे
प्र .गु. रि क्रमांक =1/2025
सागी कटसाईज नग-03
घ.मी.0.249
माल किंमत 4144=00 रुपये
1 बारशी .1 करवत आहे
हया कार्यवाहीत मा.उपवनसंरक्षक नांदेड येथील श्री.केशव वाबळे साहेब मा.सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी. डी.गिरी साहेब मा. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.पी.एल.राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी श्री.एम. एन.कत्तुलवार साहेब वनरक्षक श्री.के.पी.मुळे साहेब श्री.एम.के. केंद्रे साहेब आर.बी.दांडेगावकर साहेब श्री.बी.एस झंपलवाड साहेब श्री.महेश भोरडे साहेब श्री.ओम शिंदे साहेब श्री.एस. एस.भूरके वनसेवक नुरमामू तसेच वाहनचालक श्री. बाळकृष्ण आवले यांचा या कार्यवाहीत सहभाग होता.
किनवट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सागवान वृक्ष तोडताना तस्करांना रंगेहात पकडण्यात यश
543 Views