मुंबई’: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. पक्षाची ध्येयधोरणे आणि पुढील वाटचालीसंदर्भात वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या आढावा बैठकीला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार सुनिल भुसारा, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रवक्ते विकास लवांडे तसेच राज्यभरातील युवक पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
51 Views