KINWATTODAYSNEWS

भारतीय जनता पार्टी – सदस्यता अभियान… नांदेड उत्तर जिल्हा

किनवट:भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या “सदस्यता नोंदणी अभियान”आज महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व मा. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब , प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब, मा . रवींद्र चव्हाण साहेब, युवा मोर्चा प्रभारी विक्रांत दादा पाटील व लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या आदेशावरून युवा मोर्चाच्या चे प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात युवा मोर्चाच्या वतीने सदस्य नोंदनी अभियान संपन झाले आज किनवट शहर परिसरात आमचे मार्गदर्शक संयोजक अजितजी पाटील कव्हेकर व युवराजजी पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.

आज किनवट शहरातील अयप्पा स्वामी मंदिर परिसरात कॅम्प च्या माध्यमातून सदस्यता नोंदणीची प्रक्रिया सुरु केली गेली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून भारतीय जनता पार्टीच्या विकास कार्याचा भाग होण्याचे आवाहन केले गेले.

यावेळी सुधाकरदादा भोयर,अशोक अण्णा नेम्मानिवार,वेंकटराव नेम्मानिवार साहेब,आनंद भाऊ मच्छेवार,संतोषजी चनमनवार,विश्वास कोल्हारीकर सर,यांच्यासह आयोजक युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आशुतोष बेद्रे,धीरज नेम्माणीवार,पवन गिरी,अक्षय पावडे,परमेश्वर गोपतवाड,सुरेश साकपेलली वार,सुमित नरवटे सह सहकारी,भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

256 Views
बातमी शेअर करा