KINWATTODAYSNEWS

*आपले मानवधिकार फाउंडेशन तर्फे संजीवकुमार गायकवाड सन्मानित*

*नांदेड*:दि.७.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपले मानवधिकार फाउंडेशन मुंबई यांच्या तर्फे राज्यातील निर्भीड रोखठोक पत्रकारांची निवड करून त्यांना दर्पण दिनाचे ओचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात येत असतो या वर्षी ड्रॉ.दिपेश पष्टे संचालक शिव-संविधान व्याख्याते यांनी जेष्ठ पत्रकार आंबेडकरवादी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांना या वर्षीच्या दर्पण दिनाचे औचित्य साधून त्यांना आपले मानवधिकार दर्पण सन्मानाने सन्मानित केले असून काल दर्पण दिनाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मा.पोलीस अधीक्षक *मराठी पत्रकार दिनानिमित्त आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयात आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अबीनाशकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सुरज गुरव,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.उदयजी खंडेराय यांच्याहस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा दै.हिंदूसम्राट जिल्हाप्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड यांचे पेन,डायरी व पुष्प देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या व मा. जिल्हाअधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या वतीने सुद्धा नियोजन भवन येथे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे पद अधिकारी मोठया संख्येने उपस्तिथ होते. सर्व पत्रकारांचा दर्पण दीना निमित्य सत्कार केल्या बदल सर्व पत्रकारानी मा. पोलीस अधीक्षक व मा. जिल्हाअधिकारी यांचे आभार मानले आहेत.

93 Views
बातमी शेअर करा