KINWATTODAYSNEWS

नवनिर्वाचित मंत्री आदरणीय श्री दत्तात्रय भरणे यांनी आज महात्मे आय बँक आय हॉस्पिटल नागपूर येथे सदिच्छा भेट दिली.

नागपूर: महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मंत्री आदरणीय श्री दत्तात्रय भरणे यांनी आज महात्मे आय बँक आय हॉस्पिटल नागपूर येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी माजी खासदार सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांनी त्यांची नेत्र तपासणी देखील केली. अतिशय जिज्ञासू वृत्ती ने रुग्णालयाचे अवलोकन करून, रुग्णालयाबाबत माहिती घेतल्यानंतर संस्थेच्या धर्मादाय कार्याबद्दल त्यांनी भरभरून प्रशंसा केली. गोरगरीब गरजू रुग्णांवर संस्था निशुल्क उपचार व ऑपरेशन करते हे बघून त्यांना अतिशय आनंद झाला. तसेच समाजसेवेचे कार्य करणाऱ्या अशा संस्था इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी माझी जिल्हाध्यक्ष अमरावती सुरेखाताई ठाकरे, माजी उपाध्यक्ष अमरावती संतोष महात्मे, धनगर समाज संघर्ष समिती चे युवा प्रदेश अध्यक्ष अमन कुंडगीर,तसेच धनगर समाज संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी आदरणीय दत्तामामाचे स्वागत केले आणि अभिनंदन केले

106 Views
बातमी शेअर करा