किनवट/प्रतिनिधी: स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची जयंती गोकुंदा चौकात अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान शेकडो मुंडे प्रेमी हजर होते यावेळी अनेकांनी आपले विचार मांडत मुंडे यांच्या आठवणींना मनोगतातून उजाळा दिला. यावेळी अनेक व्यक्तींनी उपस्थिताना मार्गदर्शन करत श्रद्धा हे अर्पण केली. जयंती सोहळया निमित्त गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. यावेळी नागनाथ कराड, मुक्तारामजी घुगे, शिवसेना तालुकाप्रमुख बी एम पाटील, नामदेव केंद्रे, श्याम मुंडे, प्राध्यापक चाटे, प्राध्यापक बिबीषन पाळवदे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्ता केंद्रे, स्वाती केंद्रे, डॉक्टर गुंठापेल्लीवार, सौ. धात्रक ताई, संतोष मुंडे, आंबेकर, संपादक दत्ता जायभाये, बंटी फड, सुभाष केंद्रे, बालाजी केंद्रे ,दिगंबर मुंडे ,पप्पू घुगे ,श्रीहरी मुंडे, दत्ता ढाकणे, अमोल मुंडे, संजय केंद्रे, रामदास गुट्टे व इतर अनेक मुंडे प्रेमी जनता उपस्थित होते.
गोपीनाथराव मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी
32 Views