KINWATTODAYSNEWS

Anc सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्य जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन च्या वतीने अभिवादन

कंधार:सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्य जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे आज सकाळी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया अससोसिएशन च्या वतीने भीमगड येथील सुर्यपूत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला व भगवान गड येथील लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला जयंतीनिमिताने अभिवादन केले.या वेळी बहुजन संत भगवान बाबा व विठ्ठल रुख्मिनी च्या भव्य मूर्तीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील जातीय सलोखा अबाधित राहून सुखशांती ने सर्व समाज नांदवे असे साकडे घालून वंदन केले.
या वेळी असोसिएशनचे संचालक मयूर कांबळे,राजरत्न गायकवाड, रमेश सिंह ठाकूर,शुभम केंद्रे,निलेश गायकवाड, संभाजी कांबळे,व माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे उपस्तीत होते.

36 Views
बातमी शेअर करा