किनवट (तालुका प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षापासून तहसील कार्यालय मुख्य शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला त्रास अथवा भयंकर वेळ जात होता तसेच किनवट शहरांमध्ये तहसील कार्यालयाची नवीन इमारत हि तयार होऊन अनेक दिवस झाले होते. परंतु काही कारणास्तव सदर इमारतीमध्ये कार्यालयीन कामकाज चालू होत नव्हते परंतु सर्वसामान्य जनतेच्या इच्छेपोटी तसेच सर्वच राजकीय नेत्याच्या महत्वकांक्षा तसेच लोकप्रतिनिधीच्या पत्रान्वये विशेष करून नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव साहेब यांच्या इच्छेने, तसेच किनवट तालुक्यातील धडाडीचे राजकीय युवा नेतृत्व उमाकांत कराळे (पाटील) यांच्या पत्राची दखल घेऊन किंबहुना मागणीने तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित झाले असून या निमित्ताने तहसीलदार श्री उत्तम कागणे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा विलास संभाजी सुर्यवंशी यांनी दिल्या यावेळी रामविजय श्रीनिवास गरड (पाटील) घोटी हे उपस्थित होते.
तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित झाले
473 Views