KINWATTODAYSNEWS

21 व्या पशुगणनेस सर्वांनीच राष्ट्रीय काम म्हणून आपले योगदान द्यावे – डॉ. निरंजन बागल.

किनवट:आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेती, पशुधन व पशुपालनवर अवलंबून आहे, पशुपालन व्यवसाय हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. पशुपालक आणि पशुसंवर्धन विभागासाठी भविष्यातील ध्येय धोरणे, दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाचे योगदान ठरणाऱ्या पशुगणनेस आचारसंहिता संपताच ऑनलाईन स्वरूपात सुरूवात झाली आहे. ही पशुगणना नेमकी कशासाठी केली जाते, त्याचे पशुपालक आणि शासकीय धोरणासाठी कोणते दूरगामी फायदे आहेत याविषयी सविस्तर माहिती आकाशवाणी नांदेड केंद्र येथे किसानवाणी या कार्यक्रमात डॉ. निरंजन बागल यांनी मुलाखाती दरम्यान दिली.

*1. पशुगणना म्हणजे काय ? आणि ती नेमकी कधी सुरु झाली ?*
दर ५ वर्षांनी विविध प्रकारच्या पशूंची जसे कि गाई म्हैस, शेळी, मेंढी, श्वान, घोडा, खेचर, उंट, मिथुन इ. पाळीव प्राण्याची केलेली गणना म्हणजे पशु गणना होय.या गणनेत प्राण्यांच्या प्रजाती, वय, लिंग व मालकीची स्थिती याविषयी माहिती विचारात घेतली जाते. १९१९ पासून आतापर्यंत एकूण २० वेळा पशुधन गणना करण्यात आली आहे. त्यामध्ये शेवटची गणना २०१९ मध्ये करण्यात आली होती. २१ वि पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. हि पशुगणना १०० टक्के केंद्र पुरस्कृत अशी योजना आहे. पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय योगदान आहे.शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यकी माहितीची अत्यंत आवश्यकता असते. अशी पायाभूत माहिती हि गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते. उत्सव पशुधनाचा.. महाराष्ट्राच्या उन्नतीचा, प्रगतीचा आणि विकासाचा.

2. पशुगणनेच उद्देश काय आहे ?
विविध पशुधन प्रजातींची जात, वय आणि लिंग व उपयोगानुसार अचूक माहिती गोळा करणे. तसेच जी भटकी कुत्री, गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पोस्टेरॉल कॉम्युनिटी), गोशाळा, पंजापोळतील गोवंशाची अचूक माहिती गोळा करणे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात पशुधन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच या डेटाचा वापर पशुगणनेशी संबंधित धोरणे तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यास केला जाईल. “पशुगणना धोरणांना आकार देते, भारताच्या पशुधन क्षेत्राची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याचा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

3. पशुगणनेचे एकंदरीत स्वरूप काय असणार आहे ? उदा ऑनलाईन कि ऑफलाईन ?
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल अँपच्या माध्यमातून हि पशुगणना केली जाणार आहे. पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील कुटुंब, कॊटुंबिक उपक्रम, बिगर कॊटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या आणि राज्यात आढळणाऱ्या पशुधनाच्या १६ प्रजाती यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय व उपयोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे.

4. पशुगणना नेमका कोण करणार आहे यासाठी विशेष अशी कोणाची नेमणूक केली आहे का ?
प्रति ३००० कुटुंबासाठी ग्रामीण भागामध्ये व प्रति ४००० कुटुंबासाठी शहरी भागामध्ये नेमलेल्या प्रगणकामार्फत हि गणना केली जाणार आहे राज्यात एकूण ७४७७ प्रगणक व १४२४ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. ऐकून चार स्तरावर त्याची कार्यप्रणाली निश्चित करण्यात अली आहे . प्रगणक, पर्यवेक्षक, जिल्हा नोडल अधिकारी आणि राज्य नोडल अधिकारी अश्या पद्धतीने हे कामकाज चालणार आहे. जिल्हा नोडल अधिकारी, पर्यवेक्षक, प्रगणक यांचे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर पूर्ण झाले आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी ३०८ प्रगणक व ७९ पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन विभागामार्फत काण्यात आली आहे.

5. या पशुगणनेमध्ये कोणकोणत्या व किती प्रकारच्या पशूंची गणना केली जाणार आहे ?
२१ व्या पशुगणनेत १६ प्राण्यांच्या प्रजातींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, गयाळ (मिथुन), याक, मेंढ्या, शेळी, डुक्कर, उंट, घोडा, पोनी (लहान घोड्याचा प्रकार), खेचर, गाढव, कुत्रा, ससा व हत्ती यांचा समावेश होतो. आयसीएआर- नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस (एनबीएजीआर)द्वारे मान्यताप्राप्त या १६ प्रजातींच्या २१९ देशी जातींची माहिती या गणनेत घेतली जाईल. याव्यतिरिक्त पक्षी, कोंबडी, बदक, टर्की, लहान पक्षी, शहामृग व इमू यांसारख्या कुक्कुट पक्ष्यांचीही गणना केली जाईल. तसेच जी भटकी कुत्री, गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पोस्टेरॉल कॉम्युनिटी), गोशाळा, पंजापोळतील गोवंशाची अचूक माहिती गोळा करण्यात येणार आहे.

6. पशुगणना करते वेळेस प्रगणकांनी कुठली माहिती भाराव्याची आहे ? पशुगणना करते वेळेस पशुपालकांनी कोणती माहिती देणे अपेक्षित आहे ?
या पशुगणने दरम्यान प्रगणकाची खूप मोठी जबाबदारी असणार आहे. हि मोबाइला आपद्वारे प्रगणकाने घरोघरी जाऊन पशुपालकांकडून माहिती गोळा करायची आहे त्यात आधार कार्ड प्रमाणे त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, गावाचे नाव, व्यवसाय, शेती, शिक्षण, इ बाबींची माहिती भरायची आहे त्याचबरोबर त्या पशुपालकांच्या घरी ऐकून जनावरांची आकडेवारी (टॅग नंबर) भरायची आहे त्यात त्याची जात, लिंग, वय, उद् गाय असेल तर दूध किती देते, कुकुटपालन करत असेल तर त्याची पण आकडेवारी टाकायची आहे. प्रथमच भटका पशुपालक समुदाय, गोशाळा, पंजापोळतील गोवंशाची अचूक माहिती गोळा करण्यात येणार आहे. प्रगणकांनी एक राष्ट्रीय काम आपण करत आहोत अशी भावना मनांत ठेऊन पशुगणनेचा काम आपण केला पाहिजे. योग्य माहिती अँप मध्ये भरून काही अडचण आल्यास आपल्या पर्यवेक्षकास विचारून त्याच निरसन करायचा आहे. सोबतच पशुपालकांने पण कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता अचूक माहिती प्रगणकास द्यावी. त्याचा खूप मोठा फायदा भविष्यात पशुपालकांना होणारच आहे.

7. पशुगणना एव्हडी महत्वाची का आहे ?
पशुगणना हा पशुपालकाची सद्यस्तिथी दर्शविणारा आरसा असतो. म्हणूनच वर्तमान आणि भविष्य कालीन नियोजनासाठी पशुगणनेची आकडेवारी आतिशय उपयुक्त ठरते.
पशुधनाचा लसीकरण कार्यक्रम राबविणे.
राज्यातील दूध, अंडी, मास आणि लोकर यांचा अंदाज लावण्यास मदत.
विविध योजना राबविणे .
विविध प्रकारच्या पशुधनाचा शोध घेणे , पशुपैदास गाई व म्हशींची संख्या ठरविणे, पशुवैद्दकिय दवाखाण्याची संख्या ठरविणे.
पशुधन कुकुट आदी यांचा वृद्धिदर ठरविणे.
पशुधन क्षेत्रातील ट्रेंड, नुमने आणि आव्हाने ओळखण्यास मदत कारते.
विविध प्रदेश आणि समुदायांना त्याच्या पशुधन संख्येवर आणि गरजांवर आधारित निधी, पायाभूत सुविधा आणि सेवा यासारख्या संसाधनाचे वाटप करण्यास मदत होते.

8. पशुगणनेसाठी आपण पशुपालकांना काय आव्हान कराल?
जिल्ह्यतील पशुपालकांना पशुसंवर्धन विभाग नांदेड तर्फे असे आव्हान करतो कि, कृपया प्रगणकांना आपल्या पशूंची अचूक व संपूर्ण माहिती देऊन शासनास सहकार्य करावे. या पशुगणने तुन निश्चितपणे देश आणि राज्याला नवीन दिशा मिळण्याचं काम आपण करणार आहोत, सर्वानीच राष्ट्रीय काम मानून आपले योगदान द्यावे…

धन्यवाद…..

69 Views
बातमी शेअर करा