शिवणी प्रतिनिधी (प्रकाश कार्लेवाड)
किनवट तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वनविकास महामंडळा च्या राखीव जंगलाच्या दयाल धानोरा तांडा येथील कक्ष क्र.२७२ मधील दि.२४ जुलै शनिवार रोजी मध्य रात्रीला शिवणी निर्मल रस्त्याचा बाजूची मौल्यवान सागवणाची आठ सजीव झाडांची मशीन द्वारे कत्तल करून तस्कर सागवान लाकूड घेऊन फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शिवणी येथील दयाल धानोरा तांडा गावलगत असलेल्या रस्त्याच्या बाजूला सागवान झाडांची कत्तल करण्यात आलेली त्या झाडांची शासकीय किंमत १५६०० रुपयांची दाखवली जाते आहे.याचे पी.ओ.आर.६/३९१ या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.तर या संदर्भात विभागीय व्यवस्थापक शंभरकर साहेब व सहायक व्यवस्थापक जे.डी. पराड,यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस. पटवेकर यांच्या नेतृत्वात वनपाल,एन.एस.वाघमारे, के.पी.केंद्र,बी.एस.वडजे,व्ही.ए. मोरे.के.एम.वाट, वनमजुर, नागोराव मेंढके,सुभाष कोरेवाड,आदी कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली.अशी घटना मागील काही दिवसात याच वनपरिक्षेत्र मंडळातील कंचली येथे ही झाडांची कत्तल करण्यात आली होती.मागील एकच महिन्यात ही दुसरी घटना झाल्याने या भागातील येणाऱ्या काळात वन जंगल तुटून भुई सपाट होईल अशी मत स्थानिक नाकरिकां कडून व्यक्त केले जात आहे.तर शनिवारी रात्री झालेल्या घटने संबधी दयाल धानोरा तांडा येथील नागरिकांनी रोष व्यक्त केले आहे.तर या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांची तस्करां सोबत हात मिळवणी असल्याची दयाल धानोरा येथील स्थानिक नागरिक शंका व्यक्त करत आहेत.तर या प्रकरणाची गांमभिर्याने दखल घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच्या गस्ती साठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात यावी.व या भागात जे मौल्यवान सागवाणाची तूट होत आहे.याला आळा बसेल असे स्थानिक व या शिवणी वन परिक्षेत्र मंडळातील वन्यप्रेमी कडून बोलले जात आहे.वीस दिवसांपूर्वी याच वनपरिक्षेत्राच्या कंचली येथील राखीव जंगलातील १२ मौल्यवान सागवान झाडाची अवैध तोड करून जवळपास तीस हजार रुपये मालाची तस्करी केली होती.एकाच महिन्यात दोन वेळेस तस्करांनी तोड केल्याने वनविकास महामंडळामध्ये खळबळ उडाली आहे.वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या व वन कर्मचाऱ्यांच्या बेफिकिर वृत्तीमुळे या परिसरात अवैध जंगल तोडीचे प्रमाण वाढले आहे.दयाल धानोरा सह शिवणी परिसरात बेछूट झाडांची कत्तल होत असून मौल्यवान सागवानाची तस्करी केल्या जात आहे. या कडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांकडून तस्कर विरुद्ध कारवाई ची मागणी होत आहे.
*दयाल धानोरा येथील आठ सागवान झाडांची कत्तल;.१५६०० रुपयांचे सागवान घेऊन तस्कर फरार
115 Views