किनवट/प्रतिनिधी : किनवट वन विभागाच्या वतीने आज गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून सागी नग असलेल्या ऑटोचा पाठलाग करून मुद्देमालासह सह एक आरोपी ताब्यात घेतला तर एक आरोपी फरार झाला आहे .
आज दिनांक 12/11/2024 रोजी गोकुंदा ते चिखली (बू) रोडवर गस्त कवनरत असताना 3:45 वाजेच्या दरम्यान संशयित TS- 16 UB-7832 नंबरची ऑटो दिसल्यावरून पाठलाग करून थांबवून पाहाणी केली असता सागी कटसाइज नग दिसून आले.सादर एका आरोपीस ताब्यात घेतले व एक फरार आरोपीविरुद्ध 04/2024 नुसार वनगुन्हा नोंद करून सागी नग-48 घ.मी.-0.3286 किंमत-6933=00,अंदाजे ऑटो किंमत-40,000=00 असे ऐकून मुद्देमाल किंमत 46,933=00 जप्त करण्यात आले.ही कार्यवाही मा.उपवनसंरक्षक श्री. केशव वाबळे साहेब नांदेड मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री.जी.डी. गिरी साहेब मा.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट श्री.पी.एल.राठोड साहेब फिरते पथकचे मा.वनपरिक्षेत्र अधिकारी ए.ए.काशीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा.वनपरीमंडळ अधिकारी चिखली श्री.एम. एन.कत्तूलवार वनपरिमंडळ अधिकारी,एस.एम.कोंपलवार वनरक्षक श्री.बालाजी झंपलवाड,ए.के.फोले श्री.तसेच वाहन चालक श्री.बाळकृष्ण आवले, बी.टी.भुतनार वनमजूर शेख नुर व ईतर वनकर्मचारी यांचा या कार्यवाहीत समावेश होते.
वन विभागाची धडक कार्यवाही;सागी कटसाइज नग जप्त;एक ताब्यात
90 Views