KINWATTODAYSNEWS

निवडणूक निरीक्षक शैलेंद्र कुमार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनात किनवट मध्ये ईव्हीएम मशीन्सची व्दितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

किनवट : येथील निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयात उमेदवार , त्यांचे निवडणूक प्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता वापरात येणाऱ्या मतदान यंत्राची व्दितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरिक्षक (सामान्य) यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यशस्वीपणी पार पाडली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 83- किनवट विधानसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवार 17 अधिक नोटा एक असे एकूण 18 उमेदवार आहेत. यामुळे येथे दोन बॅलेट युनिट लागत आहेत. एकूण 331 मतदान केंद्राकरिता राखीव मतदान यंत्रासह बॅलेट युनिट (मतदान यंत्र) 794 , कंट्रोल युनिट (नियंत्रण यंत्र ) 397 व व्हीव्हीपीएटी 430 असे मतदान यंत्र ( ईव्हीएम युनिट ) लागत आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूकीकरता प्रत्यक्ष वापरात येणाऱ्या मतदान यंत्रांची (ईव्हीएम मशिन्सची) व्दितीय सरमिसळ प्रक्रिया उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी , राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात स्थापित 83- किनवट विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात करण्यात आली. यावेळी निवडणूक निरिक्षक (सामान्य ) शैलेंद्रकुमार (भाप्रसे) यांनी या प्रक्रियेसह, सर्वच निवडणूक प्रक्रिया व आदर्श आचारसंहिता पालन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सहायक जिल्हाधिकारी तथा 83- किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी निवडणूक कार्यप्रणालीची इत्यंभूत माहिती दिली व उपस्थितांच्या सर्व शंकांचे समाधान केले.
यावेळी माहूरचे तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर यादव, किनवट नमर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.अजय कुरवाडे, उप विभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे , नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, रामेश्वर मुंडे हे उपस्थित होते.

44 Views
बातमी शेअर करा