किनवट/प्रतिनिधी: दरवर्षी राष्ट्रवादीचे नेते नेते माजी आमदार प्रदीप नाईक साहेब हे आपला वाढदिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साजरा करत असतात. आणि त्या कार्यक्रमाला किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील जनता प्रचंड प्रमाणात उपस्थित दर्शवून शुभेच्छा देत असते.परंतु या वर्षी निवडणूक आचार संहिता असल्याने माजी आमदार प्रदीप नाईक हे मतदारसंघात उपलब्ध राहणार आहेत.नागरिकांनी दूरध्वनी द्वारेच शुभेच्छा द्याव्यात कोणत्याही प्रकारचे बॅनर, शुभेच्छा पत्र किंवा जाहिराती छापू नयेत. असे आवाहन प्रकाश गब्बा राठोड, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड.तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी केले आहे.
76 Views