KINWATTODAYSNEWS

किनवट डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर बालाजी नागरगोजे यांची निवड

किनवट/प्रतिनिधी: किनवट डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर बालाजी नागरगोजे यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी डॉक्टर रितेश सूर्यवंशी,उपाध्यक्षपदी डॉक्टर वसंत बामणे यांची एकमताने निवड करण्यात आली.

किनवट डॉक्टर असोसिएशनची बैठक मावळते अध्यक्ष डॉक्टर गिरीश पत्की यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत डॉक्टरांच्या विविध अडचणीवर विचार विनिमय करण्यात आले आणि पुढील वर्षाची कामाची दिशाही ठरविण्यात आली.

पुढील पाच वर्षाची कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी डॉक्टर अविनाश पवार, सहसचिव डॉक्टर अरविंद भुरके, सहसचिव डॉक्टर राहील शेख, सदस्य डॉक्टर वैजनाथ साठे, डॉक्टर शिवशंकर केंद्रे, डॉक्टर संजय लोमटे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीला डॉक्टर सतीश कांबळे, डॉक्टर उपासनी, डॉक्टर गडसिंग, डॉक्टर सुरेंद्र जनवार डॉक्टर अमोल सिन्नर डॉक्टर गावंडे ,डॉक्टर अभिजीत ओव्हाळ यांच्यासह शहरातील मान्यवर डॉक्टरांनी ची उपस्थिती होती. बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.

42 Views
बातमी शेअर करा