किनवट – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी भाजप नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दि.२५ महायुतीच्चा समन्वय समितीची बैठक केराम यांच्या निवासस्थानी पार पडली.
ते दि.२८ रोजी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीसह एकूणच प्रचार यंत्रणा कशी असावी,याबाबत स्थानिक महायुतीच्चा पदाधिकाऱ्यांशी जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी सविस्तर चर्चा करून मते जाणून घेतली.या बैठकीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे पाटील, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार, आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संजय सिडाम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष युवा अध्यक्ष चेतन मुंडे, भारतीय जनता पार्टी उत्तर विभागाचे उपाध्यक्ष एड. अविनाश राठोड व श्रीनिवस नेम्मनीवार, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप राठोड, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्वागत आयनेनीवार, जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सतीश नेम्मानीवार, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष चनमनवार, भाजपा शहर सरचिटणीस विश्वास कोल्हारीकर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माहूर नगरपरिषदेचे नगरसेवक गोपू महामुने,माहूर भाजपाचे सरचिटणीस अपील बेलखोडे, किनवट विधानसभेचे विस्तारक सुरेश लंगडापुरे, प्रवीण सिरमनवार, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस प्रा. प्रदीप एडके, दत्ता आडे, संतोष मरस्कोल्हे,सोशल मीडिया प्रमुख गौरव इटकेपेल्लीवार, शहर उपाध्यक्ष जय वर्मा आदी भारतीय जनता पार्टी व महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी भाजप नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या उपस्थितीत २५ रोजी बैठक केराम यांच्या निवासस्थानी संपन्न
229 Views