KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद- पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके

*पत्रकारांना पाच लाखांचा विमा वितरीत*

राहुरी : कोविड काळात वैद्यकीय, पोलीस, महसुल, दला व्यतिरिक्त अन्य घटकांनी देखील विशेष उल्लेखनीय कार्य केले असुन समाजातील अशा दुर्लक्षित व्यक्तींना शोधून त्यांचे मनोबल वाढविणे तसेच उर्जा देण्यासाठी राहुरी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने कोविड योध्दा हि संकल्पना बदलण्याचे केलेले महत्वपूर्ण काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्रीरामपुर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी केले.
राहुरी शहरातील योग प्रशिक्षण संकुलात प्रेस संपादक व पञकार सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर, कोविड योध्दा सन्मान तसेच पत्रकार संघाच्या सदस्यांना विमा पॉलिसीचे वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुभाष चिंधे होते.सध्याच्या काळात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून रक्तदानासाठी दात्यांनी पुढे येण्याची गरज असल्याने संघाने आयोजित केलेल्या रक्तदान कार्यक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले तर तालुक्यातील विविध घटकांनी कोरोनाकाळात आपापल्या परिने जबाबदारी सांभाळत विशेष कार्य केले त्यात अन्नदानापासून दवाखान्यात ने- आण करणारांपासून ते थेट शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा घटकांना शोधून त्यांचा सन्मान करण्याचा तसेच पत्रकार संघाच्या सदस्यांचा ५ लाखांचा अपघात विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले.
प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर, उपाध्यक्ष रमेश बोरूडे, मनोज साळवे, सुभाष आग्रे, दिपक दातीर, अशोक मंडलिक, संतोष जाधव, बाळकृष्ण भोसले, समीर शेख, आप्पासाहेब घोलप,राजेंद्र म्हसे, मधुकर म्हसे, सतीश फुलसौंदर, राजेंद्र पवार, जावेद शेख, आर. आर. जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
नायब तहसीलदार गणेश तळेकर म्हणाले कोविड काळात समाजाचे काही देणे लागतो या उद्देशातून कार्य केलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना शोधून त्यांच्या कामाची दखल प्रेस संपादक व पञकार संघाने घेतली असून ते निश्चितच प्रेरणादायी आहे.प्रशासकीय यंत्रणा सजग करण्याचे महत्त्वाचे काम देखील संघाने केल्याचे स्पष्ट करत आगामी काळात कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रेस संपादक व पञकार संघाने प्रबोधन करण्याचे आवाहन नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी केले.जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे म्हणाले प्रेस संपादक व पत्रकार संघ तळागाळातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचे काम करत आलेला आहे जनसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न पत्रकार संघाच्या माध्यमातून केला जात असून प्रसंगी प्रशासकीय व राजकीय यंत्रणांना त्यांचे कर्तव्य बजावण्याचा संदेश देत आला आहे.पत्रकारांच्या समस्या खूप आहेत त्या सोडविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक असून त्यासाठी प्रेस संपादक व पञकार संघ सज्ज असुन आगामी काळात देखील विधायक उपक्रम राबविण्याचा मानस जिल्हाध्यक्ष चिंधे यांनी व्यक्त केला. डाॅ. मिलिंद अहिरे, सहाय्यक प्राध्यापक चांगदेव वायाळ, प्रसारण अधिकारी डॉ.पंडित खर्डे, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. सुचेता कुलकर्णी, गणेश हारदे यांनी प्रेस संपादक व पञकार संघाच्या वतीने राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. नगर सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी डॉ.संध्या कोकाटे, ज्ञानेश्वर मगर, अमृत सांबरे, हसन मासद, मोहन पोकळे, सचिन पाटसकर यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.

*कोविड योध्दा सन्मानपत्राचे मानकरी*
मिलिंद आहिरे, डॉ. पंडित खर्डे, सुनील बग्गन, मनोज राजपुत, अशोक कोळगे, किरण खेसम्हासळकर, सुरेश शेंडगे, देवेंद्र वंजारे, गिता जग्गी, योजना लोखंडे, डाॅ.चांगदेव वायाळ, गणेश हारदे, अंकुश बर्डे, सलिम शेख, सोनल राका, आसाराम माळी, मोनिका गागरे, रोहिणी हुलूळे, लहु बर्डे, मोहसीन शेख, सुर्यभान माळी, अरुण बर्डे, कृष्णा पोपळघट.”
याप्रसंगी कृषिभुषण सुरसिंग पवार, पिपल्स बॅकेचे माजी चेअरमन रामदास बोरूडे, राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष मुदळ, दैनिक घडामोडीचे संपादक मनोज मोतीयानी, क्रांतीसेनेचे युवक उपजिल्हाप्रमुख शेखर पवार, नितीन खांदे,रोहीत शेटे, विजय कदम, सुनिल कोकरे, अन्सार सय्यद, मनिष कांबळे, कारभारी चिंधे, तालुका आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड, राहुरी नगरपरिषदेचे माजी उपनराध्यक्ष आर.आर.तनपुरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उंडे, माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, डाॅ.चांगदेव वायळ, प्रा संजय आघाव, गणेश खैरे, डाॅ.सचिन सदाफळ, मा.विस्तार अधिकारी दगडू तळपे, आप्पासाहेब मकासरे, माजी सरपंच जयराम औटी, अशोकराव तुपे, बाळासाहेब जाधव,विलास लाटे, संदीप सोनवणे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर तर आभार प्रदर्शन सदस्य समीर शेख यांनी मानले.

342 Views
बातमी शेअर करा