मुंबई: उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले आहे.
त्यांनी वयाच्या 86 या वर्षी अखेरचा श्वास घेतला .
मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आधुनिक युगातील एक असा उद्योजक ज्याने देश सेवा, देशातील उद्योग, उद्योग जगतामुळे संपूर्ण जगात भारत कसा अग्रेसर राहील ह्याचा ध्यास घेतला होता. एक अशी सवेंदनशील व्यक्ती जी उद्योजक तर होतीच पण तितकीच देशावर व आपल्या संपूर्ण उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अगदी स्वतःचे कुटुंब असल्या प्रमाणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व होते. जेव्हा जेव्हा भारतात कुठेही कोणतीही मोठी आपती आली तेव्हा टाटा समूहाने त्यांच्या परीने जितकी जमेल तितकी भरीव मदत केली.
समाजसेवा, मानव सेवा व देश सेवा ही मूल्ये संपूर्ण आयुष्य जपणारा एक खूप मोठा मनस्वी उद्योजक व देश भक्त आज काळाच्या पडद्या आड गेला आहे. भारताच्या उद्योग जगताची कधी ही भरून ना येणारी हानी झाली आहे.
रतन टाटा सर तुम्ही नेहमीच स्मरणात असाल….ओम शांती…भावपूर्ण श्रद्धांजली…
WE WILL MISS YOU