KINWATTODAYSNEWS

हदगाव येथील दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रराज्य आयोजित मेळाव्यात सहभागी व्हा -चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

हदगाव प्रतिनिधी
दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संसत्तेत जातानास्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेली कर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी हदगाव येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश धोटे,तर प्रमुख मार्गदर्शक दिव्यांग,वृ.नि.मि.मंडळ.महाराष्ट्
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर.विशेष ऊपस्थित विचार, संघर्षाचे संपादक अरविंद भोरे, मा.नगरसेवक हदगाव बाळाभाऊ माळोदे, प्रमुख उपस्थिती मराठवाडा संपर्क प्रमुख सुधाकर पिळगुंडे, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि.ऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, हे राहानार आहेत.

निवडणुकीत दिव्यांग, वृध्द निराधार, शेतमजुर उपेक्षित मतदाराचे कैवारी म्हणुन मते घेतात नंतर ते दिनदुबळे दिड हजारांत कसे जगतिल यांचा विचार न करणाऱ्यांचा निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी याबद्दलउपेक्षित मतदार बांधवानो जागे होने काळाची गरज आहे.कारण सत्तेत जाताना वंशपिलावळ घराणेशाही, आपल्या स्वार्थासाठी मतदार उपेक्षिताचा विचार होत नसल्यामुळे आज दिव्यांग,वृध्द, निराधार बांधव दरमाहा दिड हजार मानधनात कसे जगत असतील तेहि मानधन तिनं चार महिने मिळत नाहि हे प्रतिनिधीनि दिसत नाही, विधीमंडळात आमदार महोदय आपणच दिव्यांगासाठि आमदार निधी दरवर्षी तिस लाख रूपये आपल्या मतदारसंघातील दिव्यांगाना देण्याचा कायदा पास करून आपणच का देत नाही? आपल्या मागन्यासाठि कुठे हि आवाज न करता आपले मानधनात वाढ होते.
ज्या दिव्यांग,वृध्द, निराधाराना अल्प अनुदानात अर्धं पोटि ऊपासी राहातं असताना न्यायासाठी मोर्चे आंदोलने करून मिळत नाहि ते आपणास मते देत नाहित काय? ज्यांनी कांहि मागितले नाहि अशांना मतांसाठी आपण अनेक योजना देता तेच आपणास मते देतात काय? या सर्व विषयांवर दिव्यांचा,वृध्द निराधार, गायरानपट्टेधारक, शेतमजुर उपेक्षित येणाऱ्या निवडणुकीत आपलि भुमिका निवडणुकीत उमेदवार उभे करावे कि पाठिंबा द्यावा,कि नोटा बटन, बहिष्कार या बद्दल मेळाव्यात चर्चा करून आपलि संघटित पणे मेळ्यात सहभागी व्हावे असे आव्हान हदगाव ता.अध्यक्ष नामदेव बोडके,या.ऊप अध्यक्ष चांदराव चव्हाण, ता.सचिव नागोराव डोलनर,उमेश भगत,हेमसिंग आडे सुकळकर, दादाराव कांबळे,पांडुरंग धनगरे,शिवानंद गिरी,बोडके दिपक,महाजन शिवराज,रूस्तुम काळे,अमोल काळे, असे प्रसिध्दीपत्रक दिले

261 Views
बातमी शेअर करा