शिवणी: दि.20 जुलै मंगळवार सायकाळ पासुन ईस्लापुर, अप्पारावपेठ,शिवणी,जलधारा परिसरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असुन या पावसाने अप्पारावपेठ परिसरासह सर्वत्र कापुस,सोयाबीन,धानमडी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तर अप्पारावपेठ येथील बैल,गाई देखील पुरात वाहुन गेली आहे.नाल्या लगतच्या 100 हेक्टर जमिनी खरडुन पिके वाहुन गेल्याने शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे.
या नुकसानग्रस्त शेतकरी बैर गजानन,बैर सुनिता यांच्या शेतातील कापुस पिकांची पावसातच प्रत्यक्ष पाहणी करुन ईस्लापुर गटाचे( जि.प.सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य)श्री सुर्यकांत आरंडकर यांनी तात्काळ (तहसिलदार)उतम कागणे यांच्यांशी संपर्क साधुन अप्पारावपेठ परिसरासह ईस्लापुर गटातील विवीध गावात पावसाने अतोनात नुकसान झालेल्या व नाल्यालगत खरडुन गेलेल्या( शेकडो )हेक्टर जमिनीतील पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान ग्रस्त शेतकयांना मदत देण्याची मागणी केली आहे.यावेळी त्याच्या सोबत विनायक देशमुख, पो.पाटील भुमारेडी,माजी उपसरपंच अब्दुल रब,कौड यरया पोशट्टी,मधुसुदन रेड्डी किना याच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते.