KINWATTODAYSNEWS

धनराज राठोड यांना उमेदवारी मिळावी अशी वरिष्ठांकडे मागणी

किनवट: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातील ईच्छूक उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक स्क्रिनिंग कमिटीचे चेअरमन मधुसूदनजी मिस्त्री व प्रदेश अध्यक्ष भानुदासजी माळी साहेब व सरचिटणीस धनराज राठोड यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालय येथे पार पडली. या बैठकित
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या काँग्रेस पक्षाच्या निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मधुसुदन मिस्री सदस्य खा. सप्तगिरी उलाका, डॉ. श्रीवेल्ला प्रसाद, मन्सूर अली खान यांच्याशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली.
किनवट माहूर विधानसभा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला सोडवून घेण्याची व धनराज राठोड यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली.

255 Views
बातमी शेअर करा