KINWATTODAYSNEWS

सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तकांचा उमरी तालुका विजयी मेळावा संपन्न

नांदेड : दि.22 सप्टेंबर रोजी उमरी येथे तालुका मेळावा वसंतराव सभागृह येथे दुपारी एक ते पाच या वेळेत संपन्न झाला. शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले कॉ.सिताराम येचुरी कै.वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटूच्या जिल्हाध्यक्षा तथा राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार होत्या. उमरी तालुक्यातील मोठया संख्येने आशा गटप्रर्वत्तकं उपस्थीत होत्या.
सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या लढ्याला यश आले असून सातत्यपूर्ण आंदोलनामुळे आशाना पाच हजार रुपये मानधनात वाढ झाली आहे.
यासाठी १२ फेब्रुवारी ते १ मार्च असे २३ दिवस मुंबई येथे अखंड आंदोलन करण्यात आले.
लढल्याने जिंकता येते हा इतिहास असल्यामुळे सीटू कामगार संघटनेचा इतिहासावर विश्वास आहे म्हणून अनेक यशस्वी लढे देऊन कामगारांचे प्रश्न सोडविलेले आहेत.
यावेळी प्रास्ताविक शोभा मारावार यांनी केले तर विजयी मिळावा यशस्वी करण्यासाठी आशा वाघमारे संगीता भेरजे सुजाता लांडगे शांताबाई हंबर्डे अनिता तूपसाखरे सलमा बेगम संगीता गायकवाड आदींनी प्रयत्न केले.

218 Views
बातमी शेअर करा