किनवट/ प्रतिनिधी: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे व जी.आर. पोटफळे यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग जोगी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री पी आर वाडेकर, ( माजी मुख्याध्यापक), श्रीनिवास जाधव (तंटामुक्ती उपअध्यक्ष), आनंद भालेराव( संपादक किनवट टुडे न्यूज), शिवदास आप्पा लाटकर (सरपंच शेवडी), लक्ष्मण रामराव पोटफळे (भाजप जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्रामीण), युसुफ पटेल (नगरसेवक नांदेड), नवनाथ शेळके (पंचायत समिती सदस्य लोहा), मोतीराम दरेगावे सावकार (सरपंच), शेख हुसेन मामू (सदस्य ग्रामपंचायत शेवडी), बालाजी मारोतराव पोटफळे ,विलासराव शिंदे भगवती, श्री गणेश सूर्यवंशी सर, शिवाजी तूपकरी सर,कैलास डोळस सर,श्री भोपे सर, सर सौ.सुनिता भोपे, निलेश जावळे,शितल पोटफळे, श्री भालके सर, श्री राजेंद्र ठाकरे सर सिंदखेड,एम एस.जाधव सर,मंगेश परमेश्वर चव्हाण, धीरज मुळे, सौ दिपाली वाडकर, सुनिता शेंदलवार,सौ. सविताताई शिवराज जावळे, शोभाताई गंगाधर पोटफळे,सौ. स्नेहलता शितल पोटफळे,गिरीश पोटफळे,श्री शेटकर सर, भगत सर सारखणी आदि उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे,व सौ.सविताताई शिवराज जावळे तसेच जी.आर. पोटफळे व सौ.शोभाताई गंगाधर पोटफळे यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. दोघांनाही शाळेच्या वतीने कपडे रुपी आहेर देण्यात आले तसेच सर्व पाहुणे मंडळीचेही शाल श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री जी आर पोटफळे यांनी शाळेला शाळेचे पहिले सचिव कै.टी एस माटाकर सर यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.
याप्रसंगी श्री पी आर वाडेकर, आनंद भालेराव व श्री भोपे सर यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सुरेख संचालन मधुसूदन पहुरकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन सतीश राऊत यांनी केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील जोगी शिक्षक श्री मधुसूदन पहुरकर, उल्हास राठोड, रामराव हुडेकर, सतीश राऊत, शेख सर, कैलास वाडकर, शिरगुरवार सर सुनील सराफ आदींनी परिश्रम घेतले.