KINWATTODAYSNEWS

“अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा”* – काॅ.अर्जुन आडे

*अतिवृष्टी,नुकसानीच्या अनुषंगाने किसान सभेचे तहसील कार्यलय किनवट येथे निवेदन देण्यात आले.*

किनवट: अखिल भारतीय किसान सभा किनवट तालुका कमिटीच्या वतीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी बाबद आज दि.४ सप्टेंबर रोजी किनवट तहसिल येथे निवेदण देण्यात आले. किनवट तालुक्याच्या सर्वच मंडळात गेल्या चार-पाच दिवसापासून प्रचंड पावसाने थैमान घातले असुन शेती पिके उध्वस्त होऊन धोक्यात आली आहे. हातात तोंडाला आलेलेसोयाबीन
,कापूस ,मूग,उडीद, मका इत्यादी शेती पिके अतिवृष्टीच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेली आहे. नदी नाल्यालगतच्या शेती संपूर्णपणे खरडून निघाल्याने पिके वाहून गेली आहे अशा अवघड वेळी शासन आणि प्रशासन स्तरावरून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असुन तातडीने विनाविलंब पंचनामे करुन हक्टरी ५० हजार जाहीर करावे असे मत निवेदण सादर करतांना किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले.निवेदनात अतिव्रष्टीच्या अनुशंगाने
तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा,
नदी नाल्यालगतच्या खरडून गेलेल्या शेती व शेती पिकाची योग्य नुकसान भरपाई द्या,
पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा अग्रीम रक्कम वाटप करा, अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या वाहून गेलेल्या जनावरांना योग्य मोबदला द्या,अतिवृष्टीच्या पावसामुळे घरांची झालेली पडझडीची नुकसान भरपाई द्या,100% पीक विमा क्लेम आणि पीक विमा दावे मंजूर करा आदि मागण्या यावेळी निवेदणात करण्यात आल्या.किनवट तहसीलचे पेशकार श्री सुरवसे यांनी यावेळी मागण्याचे निवेदण स्वीकारले.

किसान सभचे काॅ.अर्जुन आडे,काॅ.शेषराव ढोले,सामजिक कार्यकर्ते विलास भालेराव,सुनिल मिरासे,सदानंद जाधव,भगवान धुमाळे,बंजरंग गायकवाड,बालाजी झाडे, काशिनाथ ढोले,नंदकीशोर मेढें,सतिष लोखंडे,माधव बोथींगे,रामेश्वर झाडे,बळवंत लोखडे,विलास व्यवारे शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

81 Views
बातमी शेअर करा