किनवट ता. प्र दि ०३ सतत कोसळत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले असुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या ढगफुटीसदृष्य पाऊसामूळे किनवट तालुक्यातील अनेक घरात व शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे या अणूषंगाने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे तत्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेस श.प.पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे कि, शेतक-यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीत न आणता सरसकट शासनाची मदत जाहीर करण्यात यावी तथा झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन शेती व घरामध्ये अतिवृष्टीचे पाणी शिरुन झालेल्या नुकसानीचा मोबदला नागरीकांना देण्यात यावा अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.
तर शेतक-यांना जिओ टॅग फोटो, ऑनलाईन पाहणी अहवाल जोडणे, ऑनलाईन छायाचित्र पाठवणे या सारख्या किचक़ट तांत्रिक अडचणी निर्माण न करता सरसकट शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली अन्यथा शासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा ही निवेदनात देण्यात आलेला आहे. यावेळी निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्यासह जिल्हाउपाध्यक्ष अनिल पाटील, कार्याध्यक्ष जहीरोद्दीन खान, बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे पाटील, युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे, उपसभापती राहुल नाईक, माजी सरपंच शेख सलिम मदार, माजी सरपंच प्रविण म्याकलवार, उपसरपंच शेख सरु यांच्यासह अली अहेमद अन्सारी, रवि तिरमनवार, शेख अफरोझ यांच्या स्वाक्ष-या आहेत व आदी उपस्थित होते.
माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे तत्काळ सरसकट शासकीय मदत जाहीर करण्याची मागणी
137 Views