जिवती/प्रतिनिधी: सुप्रीम कोर्टाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत दि 1/8/2024 रोजी दिलेल्या निकालाच्या समर्थनार्थ जिवती जि चंद्रपूर येथे समर्थन रॅली काढण्यात आली. रॅली ची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार साहेब यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या समर्थनाचे निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सांगता करण्यात आली. त्यानंतर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पंढरीनाथ गायकवाड तर उदघाटक म्हणून मा. अरुणभाऊ धोटे हे होते. तर समाजाच्या वतीने चंद्रपूर च्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री जि एस कांबळे सर ,डॉ अंकुश गोतावळे, ऍड दत्तराज गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देविदास कांबळे,प्रास्ताविक श्री भानुदास जाधव तर आभार प्रदर्शन श्री गजानन गायकवाड यांनी केले. सदर कार्यक्रम मातंग समाज जयंती उत्सव समिती च्या माध्यमातून घेण्यात आला. यासाठी समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
आरक्षण उपवर्गीकरण समर्थन रॅली तथा डॉ अण्णाभाऊ साठे यांचा 104 वा जयंती सोहळा जिवती येथे संपन्न
104 Views