(प्रतिनिधी ता. किनवट)
अवैध धंदया विरुद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले असता एका इसमाने जिवे मारण्याची धमकी व शिवागीळ केली.
सदरील सविस्तर वृत्त असे की मौजे कमठाला येथील अवैध धंदे व अवैध दारू विक्री विरोधात आकाश व्यंकट तिरमले, मारोती विठ्ठल मन्ने, शिवम पांडुरंग कऱ्हाळे, सुनिल देवराव उईके, उमेश नारायण भोयर, मारोती एकनाथ देवकते या नवयुवक तरुणांनी मिळून कमठाला येथील अवैध दारू विक्री विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणास बसले होते.
त्या मधील फिर्यादी उपोषणकर्ते मारोती देवकते यांना आरोपी किसन प्रसराम भरकड यांनी आमच्या विरोधात उपोषणास बसता का म्हणून अश्लील शिवागिळ करत अंगावर विळा घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे उपोषण कर्त्यांनी जिवित्वास धोका आहे म्हणून किनवट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या प्रकरणी किनवट ठाणे अमलदार हे तपास करीत आहेत.
अवैध धंदया विरुद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले असता एका इसमाची जिवे मारण्याची धमकी व शिवागीळ
146 Views