KINWATTODAYSNEWS

*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व आदर्श प्राचार्य पुरस्कारांचे वितरण*

*पत्रकार क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन*

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबादच्या संयुक्त विद्यमाने आदर्श प्राचार्य पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पत्रकार क्षेत्रात करिअर कसे करावे? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्राचार्य डॉक्टर कमलाकर कणसे यांनी आपल्या दिड वर्षाच्या प्राचार्य पदाच्या कालावधित उल्लेखनीय असे कार्य केले असून, त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. पांडूरंग जी. कोटूरवार माजी विद्यार्थी लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कमलाकर श्रीपतराव कनसे यांचा आदर्श प्राचार्य म्हणून सन्मान कऱण्यात आला. तसेच इयत्ता बारावीच्या बोर्ड परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर
मार्गदर्शन असा त्रिवेणी कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री नागनाथ नोमूलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.कमलाकर कनसे उपप्राचार्य डाॅ. योगेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार प्रा.गोविंद मुंडकर, जी.पी. मिसाळे, डाॅ. प्रभाकर जाधव, उपप्राचार्य अमृतराव वानखेडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे प्रदेश महिला उपाध्यक्षा श्रीमती विजया काचावार, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड़, नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री. उध्दव मामडे, जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, संजय कदम, संपादक डाॅ. सुधीर येलमे, धर्माबाद तालुका अध्यक्ष म. मुबशीर, उपाध्यक्ष चंद्रभिम हौजेकर, तसेच नांदेड जिल्हा व तालुक्यातील संपादक व पत्रकार उपस्थित होते. लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय धर्माबादचे प्राचार्य डाॅ. कमलाकर श्रीपतराव कनसे यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदर्श प्राचार्य पुरस्कार २०२४ देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयाचे आदर्श माजी विद्यार्थी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पी.जी. कोटूरवार यांना संचालक व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला.
तद्नंतर सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इयता बारावी बोर्ड परिक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेची सारा फिरोज खान ९२.१७ टक्के घेवुन प्रथम तर गंठोड मोनिका बालाजी ८९.५० टक्के द्वितीय, कला शाखेत शेवाळे सुप्रिया गणपत हीने ६७ टक्के घेवुन प्रथम तर मंथेवाड गायत्री नागोराव हिने ६४ टक्के घेवुन द्वितीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत जोगदंड ऐश्वर्या प्रल्हाद ९४.१७ टक्के घेऊन प्रथम तर धुप्पे ममताराणी अनिल – ९०.१७ टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक गोविंद मुंडकर यांनी पत्रकारिता क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयावर संखोल मार्गदर्शन केले.
तसेच ज्येष्ठ पत्रकार जी पी मिसाळे यांनी मार्गदर्शन केले. या त्रिवेणी कार्यक्रमाच्या प्रसंगी दैनिक प्राप्ती टाइम्सच्या यशकिर्ती विशेषंकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

160 Views
बातमी शेअर करा