नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड आणि दिव्यांग,वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्यासह दिव्यांग आघाडी मुखेड व मुकबधीर कर्णबधिर संघटना आणि ब्लाइंड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिनी एल्गार मोर्चा व तीव्र स्वरूपाचे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व स्वातंत्र्य लढ्यात शहिद शुरविरांना अभिवादन करून हा एल्गार मोर्चा सुरू झाला.
व जिल्हा परिषद कार्यालयावर धडकताच ऑफिसचे दोन्ही दारे बंद केले असता दिव्यांगानी घोषणेची परिसर दणानला तरी प्रशासकिय अधिकारी निवेदन स्विकारण्यास न आल्यामुळे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी उपमुख्य कार्यकारी, अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, पंचायत विभागाचे, अनेक विभागाचे प्रतिनिधी मोर्च्याचे निवेदन स्वीकारले पण पुर्वि जुलै महिन्यात मोर्चा येणार म्हणून दिलेल्या प्रश्नावर काय कार्यवाही केली असे अनेक प्रश्न चंपतराव डाकोरे, राहुल साळवे यांनी धारेवर धरले असता एकाहि प्रश्र्नांबद्दल ऊतर देता येत नसल्यामुळे आंदोलन जो पर्यंत न्याय हक्कासाठी ऊतर मिळत नाहि तो पर्यंत हलनार नाहि अशी भुमिका घेतल्यामुळे दिड तास रस्त्यावर आंदोलन कर्ते ठाण मांडले त्यावेळी लेखी ऊतर दिल्यानंतर मोर्चा रयतेचे राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून मानवंदना करून मोर्चा महानगरपालिका पालिका वर जाताच उपआयुक्त संबंधित खात्याचे प्रतिनिधी दिव्यांगाबदल आस्था दाखविली अनेक प्रश्न सोडविले अनेक प्रश्नाबदल मिटिंग संघटनेच्या पदाधिकारी सोबत घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांचे शब्द सुमणाने मोर्चकरी स्वागत करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धडकला पण तिथे मा. जिल्हाधिकारी साहेब नसल्यामुळे निवेदन स्विकारण्यास प्रतिनिधी आले असता जुलैमध्ये मोर्चा येणार असे निवेदन दिले त्यांचे साधे ऊतर का मिळाले नाही संबधिताकडुन कोणते प्रश्न सुटलेत ते ऊतर घेऊन या असे म्हणताच प्रतिनिधी मोर्चा समोर निवेदन घेण्यासाठी येईल म्हणून अनेक वक्त्यांची भाषणे झाली एक तास वाट पाहून कोण्हिहि प्रतिनिधी न आल्याने प्रशासनाचा निषेध करून मोर्चेकऱ्यांनी सणाच्या दिवशी हजारोच्या संख्येने आल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आला.
मागण्या :
१)आंध्रप्रदेशच्या धर्तीवर संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये मानधन देण्यात यावे.
२)सर्व स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांचा ५ टक्के निधी दरवर्षी पुर्णतःखर्च करणे
३) आमदार,खासदार यांच्याकडील स्थानिक विकास कार्यक्रम आणि एम्पीलैड्समधील दिव्यांगांचा राखीव निधी दरवर्षी खर्च करणे.
४) दिव्यांगांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे शिधापत्रिका देण्यात यावे.
५) दिव्यांगांना विनाअट घरकुल देण्यात यावे.
६) दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी शासकीय गाळे व २०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावे
७) जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागास इतर शासकीय विभागातील बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे.
८) दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावे या व इतर विविध मागण्यांसंदर्भात दिव्यांगांचा एल्गार मोर्चा व तिवृ स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.
या.आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील, गावातील पदाधिकारी, दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे मराठवाडा अध्यक्ष सुधाकर पिलगुंडे,जि.ऊपअध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,उमेश भगत, मगदुम शेख, दादाराव कांबळे,दिंगाबर लोणे, गजानन वंहिदे, दत्तात्रय सोनकांबळे, राजेश सुकळकर, रेवा राठोड, हेमसिंग आडे,दिंगाबर लोणे , नामदेव बोडके, रूस्तुम काळे, बालाजी होनपारखे,हेमंत पाटील ,गुबरे,चांदु गवाले, येलदे,बोईनवाड, बाला पाटिल,सुभद्राबाई शिंदे, कार्तिक ,राजु ईटलीवाले, इत्यादी पदाधिकारी हजारो बांधव उपस्थित होते.
आलेल्या मोर्च्यकराना मा. कासलीवाल साहेबानी जेवणाची उत्तम व्यवस्था ठेवली होती
9 ऑगस्ट क्रांती दिनी दिव्यांग,वृध्द निराधाराचा हजारोच्या संख्येने एल्गार मोर्चा; जिल्हा प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांगाच्या रस्ता रोको,
184 Views