नांदेड : साहित्यरत्न क्रांतिकारी लोक कवी डॉ.कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या ५५ व्या स्मृतिदिना निमित्ताने जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने १८ जुलै रोजी अण्णा भाऊ साठे मुख्य पूर्णाकृती पुतळा येथे अभिवादन सभा घेण्यात आली.
सकाळी नऊ वाजता पुतळ्यास व प्रतिमेस पुष्प आणि हार वाहून अभिवादन करण्यात आले.
या वेळी जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,सचिव राजू जाधव (ईश्वर अण्णा) संयोजक गणेश तादलापूरकर,सतीश कावडे यांच्यासह मंडळाचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.परमेश्वर बंडेवार, सूर्यकांत तादलापूरकर,सोनाजी वाघमारे,नामदेव कांबळे,प्रा.विठ्ठल भंडारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.
यावेळी विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.कॉ.अण्णा भाऊना अभिवादन केले.
एक ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती असून जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.
पूर्णाकृती पुतळा येथे डॉ.अण्णा भाऊ साठेना स्मृतिदिना निमित्ताने अभिवादन
234 Views