विधान भवन, मुंबई :
यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आज बैठक ना. श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी घेतली.
यावेळी निम्न पैनगंगा प्रकल्प कृती समिती शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींचे मुद्दे समजून घेतले.
निम्न पैनगंगा प्रकल्प उभारताना गावे बाधित न करता कोणत्या पद्धतीने पाणी अडवता येईल यासाठी सर्वतोपरी उपाययोजना सुचवून त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
विविध उपाययोजनांचा अभ्यास करून अंतिम निर्णय होईपर्यंत प्रकल्प कामाची कार्यवाही न करण्याचे निर्देशहीअधिकाऱ्यांना दिले.
गावकऱ्यांना कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये याची खात्री करण्याचेही निर्देश दिले.
तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
219 Views