KINWATTODAYSNEWS

कै.माधव रेड्डी कल्यामवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रमासह कार्यक्रम संपन्न

किनवट/प्रतिनिधी: कै. माधव रेड्डी कल्यामवार यांची 13 वी पुण्यतिथी कार्यक्रम निमित्य हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय, कणकी येथे विविध कार्यक्रमाने संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी. एस. शेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कनकी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.निरंजन बागल, ग्रामसेवक बोरकर हे होते.


विद्यालयाचे संचालक तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी कल्यामवार तसेच प्रशांत रेड्डी,निहाल रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथमतः कै.माधव रेड्डी कल्यामवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवराकडून अभिवादन करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा वाडगुरे यांनी माधव रेड्डी कल्याणवार यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रामसेवक बोरकर, डॉ. निरंजन बागल,ईश्वर चव्हाण,आनंद भालेराव यांनी माधवराव रेड्डी कल्यामवार यांच्या विषयी माहिती सांगितली. मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे यांनी अध्यक्षीय भाषण केले.

या प्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना गणेश वाटप कार्यक्रम, वृक्षारोपणाचा कार्यक्रम, त्याचबरोबर संगणक(कॉम्पुटर) कक्षाचे उद्घाटन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन बोनतावार सर यांनी केले. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

74 Views
बातमी शेअर करा