KINWATTODAYSNEWS

मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरण मागणीसाठी बेमुदतआमरण महाउपोषण सुरुच… मागील पाच दिवसांपासून जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष…

नांदेड /प्रतिनिधी( धोंडोपंत बनसोडे ) :- राज्य शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातून अ ब क ड वर्गीकरण करावे,या मागणीसह अनेक सामाजिक,शैक्षणिक, दलित मागासवर्गीय वस्तीत अवैध देशी विदेशी दारु विक्री करणाऱ्या विरुद्ध हद्दपारीच्या दरमहा केसेस दाखल केल्या पाहिजेत.तसेच समाजावर अन्याय-अत्याचार वाढलेल्या विषयी,स्वाधार योजना आफलाईन करावी या संदर्भात लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक/अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर नांदेड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर गेल्या ०१जुलै पासून बेमुद्दत आमरण महाउपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणात हजारो मागासवर्गीय,दलित बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.या महाउपोषणात सर्वसामान्य, गरीब वंचित, शोषींत,पिढीत, विद्यार्थी विद्यार्थिनी,बेरोजगार युवकांचे महत्वाचे प्रश्न घेऊन बसले आहेत.यामुळे समाजाचा जिल्हाधिकारी नांदेड,जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग नांदेड यांच्या वर वाढता दबाव येणाऱ्या काळात वाढेल आणि त्याचा मोठा विस्फोट होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडली तर यास जिल्हा प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल.पुढील काळात नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यात शेकडो समाज बांधव व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन व अन्य हिंसक आंदोलन केले जाणार काय?असा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण दिवसेंदिवस प्रा.रामचंद्रजी भरांडे सर नांदेड यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यामुळे नेत्यांस बरेवाईट झाल्यास यास जबाबदार जिल्हा प्रशासन आहे.म्हणून कायदा हातात घेऊन हजारो मागासवर्गीय,दलित बांधवांचा उद्रेक होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाऊ शकते.अशी भुमिका उपोषणस्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली असता दिसून येते आहे.या उपोषण स्थळी जेष्ठ नेते तथा विद्रोही साहित्यीक कवी नागोराव नामेवार सर,व्ही.जी.डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष,रावसाहेबदादा पवार प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी नायगाव बा.,दत्तराज गायकवाड प्रदेशाध्यक्ष युवक आघाडी महाराष्ट्र, एकनाथ रेडे, श्रीमती संजीवनी सुर्यवंशी,संगीता पवळे,सौ.वाघमारे मॅडम,अर्जुन गायकवाड मालेगांवकर, संतोष तेलंग, डी.के.पवार,संभाजीराजे वाघमारे बारुळकर जिल्हाध्यक्ष जिल्हा कोअर कमिटी,कैलास सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण,धोंडोपंत बनसोडे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर जिल्हा, जेष्ठ नेते कमलाकर महाराज,बालाजी बंगारीकर,संजय खानजोडे,नागोराव ईबितवार,संतोष भालेराव होंडाळकर,शिवराज केदारे डोंगरगावकर,अंकुश गायकवाड, गोविंद जोंधळे,लक्ष्मण निदानकर,सुनील जाधव, साहेबराव गव्हाणकर,सचिन सूर्यवंशी, सदानंद ऐरणकर पार्डीकर,गोविंद रेडे,गंगाधर गायकवाड निमटेककर,पी.जी.केदारे, मारोती टिकेकर नागापूरकर,अनिल काळे कोहळीकर,गजानन मनपूर्वे, रामदास जळपते पोटेकर,सुरेश झुरेकर कुपटीकर,दशरथ आंबेकर, आदी जण यावेळी आवर्जून उपस्थित होते.दररोज शेकडो समाज बांधव महिला पुरुष युवक युवती सेवानिवृत्त कर्मचारी भेट देऊन सरांना पाठिंबा देत आहेत.पुढील काळात आपण कोणताही निर्णय घ्या आम्ही सर्वजण मिळुन रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करुयात असे म्हणत आहेत.

267 Views
बातमी शेअर करा