किनवट /प्रतिनिधी: दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी सायंकाळचे साडे सहाच्या दरम्यान अवकाळी वादळी पावसाने जोरदार तडाका दिल्यामुळे गावातील अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गावातली घरावरचे जवळजवळ 90% पत्रांची घरे उध्वस्त झाली आहेत, लाईटचे खांबे आडवे झाले आहेत झाडे तुटले आहेत शेतात एक जवारी आडवी पडल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे
यासंबंधी गावकऱ्यांनी प्रशासनाला संध्याकाळी सात वाजता फोन लावून घटनेची माहिती दिली असता 24 तास उलटून गेले तरी या गावाकडे कोणत्याही अधिकारी कर्मचारी फिरकला नाही किंवा विचारपूस केले नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच लाईटचे खांब पडल्यामुळे लाईट विस्कळी झाली आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चक्कीवरील दळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. फोन वरून संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी उडवा उडीचे उत्तर देत इलेक्शनची तयारी चालू असल्याचे करणे पुढे केली जात आहेत.
तेव्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी हे या बाबीकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न येथील गावकऱ्यांकडून विचारला जात आहे.
किनवट तालुक्यातील दरसांगवी (ची) येथे अवकाळी पावसाचे थैमान;24 तास उलटून गेले तरी एकही अधिकाऱ्यांनी भेट नाही.गावकरी चिंतेत.
365 Views