KINWATTODAYSNEWS

किनवट दुर्गम भागातील डॉ. अशोक बेलखोडे यांनी केल्यात १ लाख कुटुंब कल्याणाच्या शस्त्रक्रिया

किनवट: महाराष्ट्राच्या एका कोप-यात आदिवासी एक बहूल तालुका विकासापासून दूर परीसर अंतराने मोठया शहरापासून दूर तसाचा विकासापासून दूर तसेच आरोग्य सुविधांपासून दूर व वंचीत म्हणुन ओळखला जातो. अशा दुर्गम व दुर्लक्षीत अविकसीत, पूर्वी नक्षलग्रस्त म्हणुन कुप्रसिध्द असलेल्या एकंदरीत अवघड अशा ठिकाणी डॉ. अशोक बेलखोडे यांनी (MS General Surgeon) मागील 30 वर्षापासून भारत जोडो युवा अकादमी, संचलित साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून निस्वार्थपणे अविरत आरोग्य सेवा देत आहेत.
डॉ. अशोक बेलखोडे मुळचे नागपूर जिल्हयातील कोतेवाडा या गावाचे रहिवासी, औरंगाबाद येथून MBBS व पुढे वैद्यकिय क्षेत्रातील MS पर्यंतचे उच्च शिक्षण घेउन तज्ञ डॉक्टर बनून आपल्या आरोग्य सेवा व कौशल्य केवळ वंचितासाठी उपयोगी पडाव्या या उदात्त हेतूने त्यांनी किनवट हे आपल्या आयुष्यभराचे कार्यक्षेत्र मानले. जेष्ठ समाजसेवक आदरनिय कर्मयोगी बाबा आमटे यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात. तर लोकही त्यांना अलिकडे बाबांचे “मानसपुत्र” म्हणुन ओळखतात. डॉ. अशोक बेलखोडे यांनी बाबा आमटे यांना मरेपर्यंत किनवटलाच राहील असा शब्द देउन 1993 साली किनवटला आले व तेव्हापासून त्यांच्या अनेकविध सेवांचा महायज्ञ सुरु आहे.
अशा या निश्नांत व नि:स्वार्थ काम करणा-या जेष्ठ डॉक्टरने राष्ट्रीय कुटुंब कल्याण लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमात मोलाचा हातभार लावला असून आतापर्यंत त्यांनी 01 लाखावर शस्त्रक्रिया केल्याचा टप्पा ओलांडला आहे. नुकतेच दिनांक 23 मार्च 2024 रोजी औरंगाबाद तालुक्यातील गोलवट प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजीत केलेल्या भव्य कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीरात हा 01 लाखाचा टप्पा गाठला आणि ओलांडला देखील.
आज घडीला 100124 पर्यंत शस्त्रक्रिया डॉ. अशोक बेलखोडे यांच्या हातून झाल्या आहेत. त्यात जवळपास 36 हजार हया टाक्याच्या पारंपारीक शस्त्रक्रिया व उरलेल्या सर्व बिन टाक्याच्या म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेल्या लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया आहेत. या सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना 2 लाख 25 हजार पेक्षा जास्त किलो मिटरचा प्रवास करावा लागला. या सर्व शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रात, फारशा सुविधा उपलब्ध नसतांनाही पार पाडल्या आहेत. अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील, वाडी वस्त्यावरील महिला/स्त्रीयांनी त्यांचा लाभ घेतला आहे. ख-या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राला या अंत्यत महत्वाच्या व तज्ञांच्या सेवा डॉ. अशोक बेलखोडे यांच्या रुपाने मिळाला आहे. या 1 लाख स्त्रीयामध्ये अंत्यत अवघड आणि गुंतागुंतीच्या अशा सिझेरियन झालेल्या स्त्री लाभार्थी 9358 आहेत. त्यात फक्त लेप्रोस्कोपीनेच शक्य असणा-या (टाक्याची शस्त्रक्रिया शक्य नसलेल्या) 1500 स्त्रियांचा समोवश आहे. असे हे महान कार्य डॉ. अशोक बेलखोडे यांच्या हातुन घडले आहे.
आपण कधी आकडयांचा व संख्येचा विचार केला नाही उलट आपल्या हातुन चांगले काम घडत आहे. स्त्रीयाचे गरोदरपण व बाळंतपणाचा त्रास यातून त्यांची मुक्तता करीत आहे, ही भावना त्यामागे आहे असे प्रांजळ मत डॉ. अशोक बेलखोडे यांनी नम्रपणे व्यक्त केले आहे. एका दिवसात 100 शास्त्रक्रिया 132 वेळा, 200 शस्त्रक्रिया 36 वेळा, 300 शस्त्रक्रिया 08 वेळा तर अगदी पुर्ण 24 तासात एकूण 400 शस्त्रक्रिया 02 वेळा एवढे परीश्रम त्यांनी घेतले आहे. तर कधी 40, 42 कधी 50 किंवा त्यापेक्षाही जास्त लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया एका दिवसाला त्यांनी केली असून आतापर्यंत साधारणपणे डॉ. साहेब 40 वेळा 90 वर आउट झाले आहेत. अशा प्रकारे अनेक शिबिरातून शास्त्रक्रिया केल्या आहेत.
मराठवाडयातील नांदेड जिल्हयातील 28 हजार शस्त्रक्रियेसोबत हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि परभणी व विदर्भातील वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती जिल्हयातील मेळघाट भागातील चिखलदरा व धारणीचाही समावेश आहे. एवढेच नव्हे तर शेजारच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, उटनूर इत्यादी ठिकाणी जाऊन अनेकदा डॅक्टारानी या शस्त्रक्रिया केल्यात.
ह्या शस्त्रक्रिया करणे, आपल्या आनंदाचा भाग असून त्या आपण खुप मन लावुन करतो, त्यामुळे आपल्या हातुन सेवा घडते असे सांगत यामध्ये पुरुषाचा नगण्य सहभाग असणे, सीझर झालेल्या स्त्रीलाही पुढे करुन पुन्हा एकदा जोखीम पत्कारणे व पुरुषानी बाजूला राहणे, तसेच एवढेच काय आजारी अगदी हृदयरोग असलेल्या पत्नीच्या पतीने काही झाले तरी मी शस्त्रक्रिया करणार नाही असे म्हनणे, तसेच लवकर लग्न, लवकर बाळंतपण व 20 – 21 व्या वर्षी मुले बंद करण्याची शस्त्रक्रिया करणा-या स्त्रीयाची संख्या 50 टक्के पेक्षा जास्त इत्यादी बाबी आपले मन हेलावुन सोडते, अशी खंत डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केली. सीझर झालेल्या स्त्रीयाच्या बाबतीत पतीने मुले बंद होण्याचे शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पुरुषांना करीत, गरज पडल्यास शासनाने त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा असे त्यांनी सूचित केले.
दिनांक 23 मार्च 2024 रोजी गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे शिबीरातील 42 व्या क्रंमाकावर असलेल्या सौ. आशा रामचंद्र साळूंखे 25 वर्ष राहणार गोलटगाव या महिलेची शस्त्रक्रिया करुन 01 लाखाचा पल्ला पूर्ण केला. विशेष म्हणजे त्या स्त्रीने एका अपत्यावर आपली शस्त्रक्रिया करुन घेतली. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डॉ. लांजेवार यांनी शेकडो नातेवाईकांच्या व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थित सत्कार करुन हा क्षण साजरा केला. आज पर्यंत हा आकडा 01 लाख 124 वर पोहोचला असून जमेल तोपर्यंत या शस्त्रक्रिया आपण करत राहू असे मनोगत डॉ. अशोक बेलखोडे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
या शस्त्रक्रिया क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा अलीकडच्या काळात अनेक अवघड अशा केसेसना झाला आहे. सिझेरियन झालेल्या लाभार्थी बरोबर लठ्ठपणा आहे म्हणून अनेक सर्जननेही नाकारलेल्या अतिलठ्ठ स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. साठ, सत्तर, ऐंशी किलोग्रॅम वजन असलेल्या स्त्रिया नेहमीच्याच झालेल्या आहेत. ब्यानव, अठ्यानाव, एवढेच काय शंभर पेक्षाही जास्त वजनाच्या अनेक स्त्रियांवर डॉ. अशोक यांनी शस्त्रक्रिया केली आहे. वैजापूर तालुक्यातील शिरूर या गावी अगदी एकशे नऊ किलोग्रॅम वजनाच्या एका स्त्रीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्याचे डॉ. आवर्जून सांगतात. अश्या स्त्रियांच्या पतीने पुढे होऊन स्वतः शस्त्रक्रिया का करू नये असा प्रति प्रश्नही ते करतात.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातून 1987 साली Master of Surgery (MS) शल्यचिकित्सक ही पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडले. तेथूनच त्यांच्या वैद्यकिय कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे नवी मुंबई, वर्धा, कोकणातील देवरुख, छत्रपती संभाजीनगर येथील पाचोड, जिकठान प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढे मागील 30 वर्षापासून किनवट या आदिवासी भागात वास्तव्यास राहून विविध भागात फिरुन हया शस्त्रक्रिया केल्या व औरंगाबाद परिसरामध्येच हा 01 लाखाचा पल्ला गाठल्याबद्दल डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले. त्यावेळेस ते अतिशय भावुक झाले होते. त्यांच्या विद्यार्थी दशेतील हॅलो या वैद्यकिय विद्यार्थांच्या चळळीत आपण सक्रिय असतांना या परीसरात वैद्यकिय सेवेचे कार्य करतांना समाजसेवेची बिजे रुजली गेली त्यात याच गोलटगावला त्या काळात भेट दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगीतले. त्यावेळी कृषी रत्न, कृषीभूषण विजय अण्णा बोराडे, बॅरीस्टर जवाहर गांधी, डॉ.शशीकांत अहंकारी व गोलगावचे प्रगतीशिल शेतकरी सुदाम आप्पा सांळुके, पांडूरंग आण्णा सोळुंके इत्यादी मंडळी सोबत होती. या आठवणींना उजाळा त्यांना दिला.
या सर्व प्रवासात सर्जरी विभागातील त्यांचे गुरु डॉ. कांचन, डॉ. साठे मॅडम, डॉ. मलिक, डॉ बोरगावकर, डॉ. स्वामी, पुण्याचे डॉ. दाणी तसेच आरोग्य प्रशासनातील डॉ. कर्नाटकी, डॉ. सांळखे, डॉ. पी. पी. डोके, डॉ. डी. आर. डोके, डॉ. भांगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठाकूर, डॉ. सुरडकर, नांदेडचे डॉ. ना. रा. शिंदे, डॉ. कठारे, डॉ. बंदीअल्ली, डॉ. पेरगुलवार, डॉ. मेकाने, डॉ. बालाजी शिंदे, डॉ. सलमा हिराणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर अशा अनेक जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे अभार मानले.
नांदेड शिवाय हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, परभणी, लातूर, जालना, संभाजीनगर, इत्यादी ठिकाणचे जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, इतर वैद्यकिय अधिकारी यांचेही त्यांनी मनापासून आभार मानले.
विशेष म्हणजे सर्व शस्त्रक्रिया करुन घेणा-या सर्व स्त्रीया, त्यांचे पती, पुरुष, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मन वळवून माझ्यापर्यंत आनणारे मतप्रर्वतक, आशावर्कर, अंगणवाडीताई, सर्व स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी, त्यांचेही या यशात मोठा वाटा असल्याचे डॉ. अशोक बेलखोडे यांनी नमूद केले.
भारत जोडो युवा अकादमी संस्थेतील माधव बावगे, डॉ. सविता शेटे, धर्मराज हल्लाळे, डॉ. शारदा कदम, प्रा. राम राठोड, अनिकेत लोहिया,डॉ. क्रांती रायमाने व इतर सहकारी सदस्य यांचे आभार मानले.
या सर्व शास्त्रक्रिया करतांना सदैव सहकारी म्हणुन असलेले मेहेरसिंग चव्हाण, आता अलीकडे श्री. नथ्थू भडांगे, परमेश्वर कदम, दम्मण्णा काका, वंदनाताई, सतत माझ्यासोबत राहणारी माझी आई स्वर्गीय शांताबाई, माझे काका भैयाजी बेलखोडे, वडील बंधु मुरलीधर बेलखोडे व सर्व बेलखोडे कुटुंबिय, कु. आश्विनी, कु. तेजस्वीनी, साने गुरुजी रुग्णालयातील सहकारी तसेच अहोरात्र प्रवास करुन सुखरुप घरी आनणारा माझा वाहन चालक श्री. अजिंक्य कयापाक यासह पूर्वीचे सर्व वाहनचालक, साने गुरुजी रुग्णालय परीवारातील सर्व सदस्य यांचेही त्यांनी मनापासून अभार मानले.
हा कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमूख व्हावा, त्याची गूणवत्ता वाढावी इत्यादी बाबतीत अनेक सूचना डॉ. अशोक बेलखोडे यांनी केले व हा विषय वेगळया वेळी चर्चा करू असे ते म्हणाले. या अथक प्रवासात येणा-या अनंत अडचणी व त्यांनी त्यांचा केलेला सामना बाजूला ठेवून केलेली सेवा खरोखर वाखानण्यासारखी आहे. त्याबद्दल विचारले असता अडचणीचा पाढा काय वाचायचा असे सांगत त्यावर मात करावी असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
या शस्त्रक्रिया पार पाडल्याबद्दल लोकमत परिवार, महाराष्ट्र टाईम्स व ह इतर पत्रकार मित्रांनी हा पल्ला गाठल्याबरोबर डॉ. अशोक बेलखोडे यांची दखल घेउन अभिनंदन केले व आनंदात सहभागी झाले, त्यांचा उत्साह वाढवला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शूभेच्या दिल्यात.
तसेच किनवट शहरातील व परीसरातील प्रतिष्ठीत नागरीक व मित्र परीवारांने डॉ. अशोक बेलखोडे यांचे अभिनंदन केले.

शंब्दाकन: डॉ. शिवाजी गायकवाड
27 मार्च 2024 किनवट

103 Views
बातमी शेअर करा