KINWATTODAYSNEWS

*संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या सरकारला नागरिकांनी मतदानातून जागा दाखवून द्यावी. महाविकास आघाडीचे उमेदवार… मा.आ.वसंतराव चव्हाण*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.२४.लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नायगाव विधानसभा मतदारसंघातील धर्माबाद येथे तालुकास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा धर्माबाद येथिल मार्कंडेय समाज मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा महाविकास आघाडीच्या सर्व शिवसेना ठाकरे गटाचे व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्त्याचया वतीने उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असताना मा.आ.वसंतराव चव्हाण म्हणाले की,
सध्या या देशाची परिस्थिती हि सर्व सामान्य जनतेला अडचणीत आणणारी आहे.

भा.ज.प.सरकारच्या काळात गॅस दरवाढ,सध्या पेट्रोल -डिझेल दरवाढ,महिलांचा प्रश्न,बेरोजगारांची समस्या,शेतकऱ्याचा प्रश्न अशा अनेक समस्या या प्रत्येकाला विचार करावयाला लावणारे आहेत.हे खोटारडे सरकार मोदी सरकार,मोदी सरकार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेताना दिसतात. आपण तर या भारत सरकारचे भूमीपुत्र आहोत. हे सरकार मोदी सरकार नसून भारत सरकार आहे.

निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षातर्फे मला उमेदवारी मिळाली आणि मी आपल्या सेवेसाठी उभा आहे. या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या भागात मी दहा वर्ष आमदार म्हणून काम सुद्धा पहिलो आहे. सत्ता ही तर येते आणि जाते पण आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे मला पुन्हा एक संधी देऊन लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. या देशात आपले नेते राहुल गांधीनी सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन भारत जोडो यात्रा काढली.आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारताचे संविधान मानणारे लोक आहोत.आज सत्तेवर बसलेल्यांनी संविधान बदलण्याची भाषा करतात. चारशे पार ची घोषणा देतात.संविधान बदलले तर लोकशाही राहणार नाही हुकूमशाही येईल.याचा फैसला आपणाला संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या मताच्या अधिकारातून दाखवून द्या असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी धर्माबाद येथे कार्यकर्त्यांना संबोधताना प्रतिपादन केले.

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनी सुद्धा उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रविंद्र चव्हाण उर्फ बंडू पाटील यांचीही उपस्थिती होती.
तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा उपप्रमुख गणेश गिरी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रामचंद्र रेड्डी,शिवराज भाऊ मोकलीकर,बालाजी बनसोडे,गणपत कात्रे यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

यावेळी माझी नगरसेवक भोजराम गोणारकर,सुधाकर जाधव,आबेद भाई,अयुब भाई,गणेशराव पाटील बाचेगावकर,बंडू पाटील नरवाडे बाभळीकर,माजी नगरसेवक निलेश पाटील बाळापूरकर,सामाजिक न्याय विभागाचे नांदेड जिल्हा सहसचिव संजीवकुमार गायकवाड,धर्माबाद काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे चे तालुकाध्यक्ष गंगाप्रसाद डुमणे,ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र रेड्डी अण्णा,विठ्ठल कुंडलवाडे,मतीनशेठ,साहेबराव पवार,राजू पाटील कदम,सूर्यकांत पाटील जुनीकर,साहेबराव सोनकांबळे,शुभम शिवशेटे,माधव कदम पिपळगावकर,बळीराम पाटील पवार,लक्ष्मण पाटील येताळा, शेख जावेद फुलवाले करखेलीकर,शेख तोफिक,मारुती पाटील करमणे,सायलू दसरवाड, श्रीनिवास जाधव,मारोती कागेरू,महिला आघाडीतील,सुलताना बेगम, पदमीनबाई सूर्यवंशी,माजी नगरसेविका नीता गायकवाड,मीना भद्रे,यासह शेकडो महिलाची कार्यक्रमाला उपस्थित होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सखारामअण्णा निलावार यांनी निवडणुकी संदर्भातील कार्यक्रम आयोजनामागची भूमिका मांडली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधव पाटील चोंडिकार व होजेकर यांनी केले.

यावेळी महाविकास आघाडी मधील सर्व पक्षांचे कार्यकर्ते व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सर्वांचे आभार माधव पाटील चोंडीकर यांनी मानले.

932 Views
बातमी शेअर करा