*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२३.जिल्यातील देगलूर येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व राज्याचे माजी मंत्री तथा मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाची संघटनात्मक बैठक व पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.
बैठकीच्या प्रारंभी माजी आमदार कै.गंगारामजी ठक्करवाड यांना आदरांजली वाहण्यात आली.
राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळातील सर्व निवडणुका होतील आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह सर्वानाच न्याय मिळेल असा विश्वास आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी व्यक्त केला.
यावेळी नांदेड लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी मंत्री माधवराव किन्हाळकर,आमदार राम पाटील रातोळीकर,आमदार राजेश पवार,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे,माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,माजी आमदार अविनाश घाटे,माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे,लोकसभा प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर,राजेश कुंटूरकर,उमाकांत गोपछडे,बालाजीराव बच्चेवार,शिवाजीराव बळेगावकर,माजी जि.प.सदस्य रामराव नाईक,माजी सभापती मिसाळे गुरुजी,देगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर,चंद्रशेखर पाटील,आनंदराव गुरुजी बिराजदार,प्रकाश पाटील बेंब्रेकर,श्रीनिवास पाटील नरवाडे,शंकरराव काळे,शंतेश्वर पाटील,विजय सावकार,संतोष पाटील,इंद्रजित तुडमे,माधव वाघमारे,अशोक साखरे,शंकर काळे,एकनाथ पाटील वडगावकर,डॉ.लखमपुरे,डॉ.प्रशांत सब्बनवार,गंगाप्रसाद यनावार,जनार्दन बिराजदार,सौ.मीराताई संगनोर,सौ.संगीता भेर्जेवार,सौ.मीनाक्षी बिराजदार,सौ.राधिका पटवारी,यांच्यासह देगलूर व बिलोली विधान सभा मतदार संघातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.