KINWATTODAYSNEWS

*घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन*करू…उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी महाराज* *लाभार्थ्याकडून संताप व्यक्त?*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.८. जिल्यातील १६ तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिकांना व गोरगरिबांना आपल्या हक्काचे पक्के घर असावे यासाठी शासनाने घरकुलाची योजना ही अनेक वर्षापासून राबवली जात आहे.

त्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाते परंतु बांधकाम साहित्याचे उदा सिमेंट,गजाळी,रेती,वीट,इतर साहित्य यांचे वाढते भाव सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाहीत आज घडीला रेती ही 30 ते 35 हजार एक हायवा मिळत आहे एक ब्रास घेण्यासाठी सात ते आठ हजार रुपये मोजावे लागत आहेत हे सर्व पैशाची जुळवा करत असताना घर बांधण्यात बांधण्याचे स्वप्न हे अधुरे राहत आहे.

शासनाने एक वर्षांपूर्वी सहाशे रुपये ब्रास रेती देण्याची घोषणा केली होती मात्र ही घोषणा प्रत्यक्षात उतरली नसल्याने शासकीय योजनेची बांधकामे खोळंबली आहे व घरकुल बांधणे अवघड झाले आहे त्यामुळे शासनाची रेती कधी मिळणार? असा सवाल ग्रामीण भागातील नागरिक करत आहे शासनाने 600 रुपये ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा जनतेच्या हिताचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु या घोषणाला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले असून अमलबजावणी पूर्ण झाली नसल्याने नागरिकांच्या आनंदावर विर्जन पडले आहे आता सहाशे रुपये ब्रास मिळणारी रेतीची आशा नागरिकांनी सोडून दिली आहे.

ग्रामीण भागात रमाई आवास योजना,मोदी आवास घरकुल योजना,पंतप्रधान आवास योजना असे योजनेतून घरकुलाची कामे केली जात आहेत घरकुल बांधकामास शासन एक लाख 48 हजार रुपये मिळतात हे परवडणारे नसल्याने त्यातून आपले घर हे चांगले बांधता आले पाहिजे म्हणून आपल्याजवळ पैसे टाकून घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु रेती महागल्याने घर बांधणे आता तरी कठीणच होत चालले आहे त्यामुळे काही ठिकाणी बांधकामे अर्धवट सोडून दिले जात आहे शासनाकडून गरीबाची थट्टा होत आहे घरकुल यादीत नाव आल्यानंतर प्रत्यक्षात घरकुलाचा धनादेश मिळवण्यासाठी तोही टप्प्या टप्प्याने पैसे पडत आहेत त्यातही घरकुलाच्या अनुदान तुटपुंज अनुदान शासनाकडून दिल्या जाते त्यात आजही महागाई पाहता घरकुलाचे बांधकाम करणे कठीण झाले आहे.

*शहरी व ग्रामीण भेद का?*

सरकार ग्रामीण भागा तील लाभार्थ्यासाठी कमी अनुदान दिले जाते.तर शहरी क्षेत्रात अधिक अनुदान दिले जाते. दोन्ही ठिकाणच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य सारख्याच किमतीला उपलब्ध आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यावर अन्याय होत आहे या योजनेतील होण्याचे मागणी धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे. घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असे दैनिक वृत्त युगांतर धर्माबाद तालुका प्रतिनिधी नागनाथ माळगे यांना मुलाखतीमध्ये म्हणाले प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी केले आहे.

घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून पाच ब्रास रेती फ्री कधी मिळणार असा घरकुल लाभार्थ्याकडून संताप जनक प्रश्न ?
घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी शासनाची रेती कधी मिळेल तालुक्यातून लाभार्थ्याकडून संताप व्यक्त होत आहे.

घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर रेती उपलब्ध करून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असे दैनिक वृत्त युगांतर धर्माबाद तालुका प्रतिनिधी नागनाथ माळगे यांना मुलाखतीमध्ये प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी केले आहे.

101 Views
बातमी शेअर करा