*सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे जाचक अट रद्द केल्याचे पत्र संघटनेस प्राप्त*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.६.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०२४ या शैक्षणिक वर्षापासून विध्यार्थ्यांना धक्का देणारा आणि जाचक शासन निर्णय समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या मार्फत काढून विध्यार्थ्यांना अस्वस्थ करणारे संदेश पाठविण्यात आले होते.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू )आणि डेमो्क्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डी.वाय.एफ.आय. कडे पालक आणि विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.
त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन दि.६ मार्च रोजी सिटू आणि डी.वाय.एफ.आय. संघटनेच्या वतीने समाज कल्याण नांदेड कार्यालया समोर एकदिवशीय धरणे सुरु केले होते.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या सोबत शिष्टमंडळाने चर्चा केली आणि स्वाधार ची जाचक अट रद्द केल्याचे लेखी पत्र संघटनेस देण्यात आले.त्यामुळे समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी लागू केलेली जाचक अट रद्द करण्यात आली.
या धरणे आंदोलनासाठी सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,डी.वाय.एफ.आय. तालुका निमंत्रक नांदेड,कॉ.शाम ए. सरोदे, डी.वाय.एफ.आय.शहर निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड,कॉ. विजय सरोदे, कॉ.दिलीप कंधारे. व्यंकटराव सोनटक्के, कॉ. सचिन वाहुळकर, कॉ. गंगाधर खूने.आदीसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती
कॉमरेड शाम सरोदे
DYFI तालुका निमंत्रक नांदेड.
यांनी आमच्या प्रतिनिधीना बोलताना दिली आहे