किनवट/प्रतिनिधी: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी किनवट शहरातील बस स्टँड जवळील पुलावर रस्ता रोको करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत किनवट मधील मराठा आंदोलकांनी आंदोलन करून किनवट माहूर रस्ता रोखला होता.
याप्रसंगी मराठा आंदोलकांनी विविध घोषणा दिल्या
त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील प्रवासी बराच काळ खोळंबले होते. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मराठा समाजातील आंदोलकांनी आंदोलन शांती संपन्न केले.
या आंदोलना प्रसंगी किनवट पोलीस स्टेशन तर्फे मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता.
106 Views