किनवट प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या किनवट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शहरातील व्यापाऱ्यांनी संवयस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश जारी केल्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काही काळ आंदोलन स्थगित केले होते राज्य सरकारकडून कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास प्रारंभ केला. दरम्यान त्यांच्या समर्थनात सकल मराठा समाजाने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या अनुषंगाने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी किनवट बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ भाजीपाला मार्केट मच्छी व चिकन मार्केटची दुकानें दिवसभर बंद होती या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. शासकीय कार्यालये, शाळा दवाखाने वगळता जवळपास सर्व बाजारपेठ बंद होती.दरम्यान 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सकाळी 10 वा जिजामाता चौक येथे संत सेवालाल महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनात सकल मराठा समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपविभागीय पोलिस अधिकारी मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पोलीस निरीक्षक अनिल बिर्ला यांनी या बंद आंदोलनादरम्यान चौक पोलीस बंदोबस्त ठेवला होता किरकोळ घटना वगळता किनवट व गोकुंदा येथे शांततेत बंद पाळण्यात आला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या प्रसारित होत असल्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली असून राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील अशा भावना सकल मराठा समाजातील नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. या बंद दरम्यान ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या किनवट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
295 Views